हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर, प्लॉट किंवा एखादी जमीन खरेदी करताना सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक असतात ती लागणारी कागदपत्रे. या कागदपत्रांमुळेच व्यवहार व्यवस्थितरित्या पार पडतो. परंतु अनेकवेळा नवीन खरेदीदाराला माहीतच नसते की, आपल्याला नेमक्या कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की घर, फ्लॅट किंवा एखादी जागा खरेदी करताना कोणती कागदपत्रे जवळ असणे गरजेची आहेत.
मालमत्ता खरेदी करताना लागणारी कागदपत्रे – ज्यावेळी आपण नवीन बांधलेले किंवा पूर्वीच्या मालकाकडून मालमत्ता खरेदी करतो त्यावेळी पॅन कार्ड, वैयक्तिक ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा सरकारकडून जारी करण्यात आलेले कोणतेही वैध ओळखपत्र आवश्यक असते. तसेच, मालमत्तेसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे ही लागतात. तसेच, समोरील व्यक्तीचे ओळखपत्र, इतर माहिती ही तुमच्याजवळ असायला हवी.
कंपनीच्या नावे मालमत्ता खरेदी करताना लागणारी कागदपत्रे – अनेकवेळा कंपनीच्या नावावर किंवा एखाद्या फॉर्मच्या नावावरही मालमत्तेची नोंदणी केली जाते. अशावेळी कंपनीच्या मालकाचे पॅन कार्ड, कंपनीचे मेमोरँडम आणि लेख, कोर्पोरेट ओळख क्रमांक, बोर्ड रेझोल्यूशन, अशी कागदपत्रे आवश्यक असतात. यासह स्वाक्षरी करणारे अधिकारी, कंपनीत नियुक्त केलेले अधिकारी ही गरजेचे असतात.
अनिवासी भारतीयांसाठी लागणारी कागदपत्रे – भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना भारतामध्ये मालमत्ता खरेदी करता येऊ शकते. परंतु त्यांना शेतजमीन कोणतीही बाग किंवा फार्म हाऊस खरेदी करता येत नाही. यात त्यांना व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार असतो. यासाठी त्यांना वैयक्तिक ओळखपत्र पॅन कार्ड पासपोर्ट सारखे कागदपत्रे जवळ असणे बंधनकारक असतात. या कागदपत्रांमध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
भागीदारीत मालमत्ता खरेदी करताना लागणारी कागदपत्रे – एखादी मालमत्ता दोन भागीदारी कंपन्यांमध्ये खरेदी करता येऊ शकते. यासाठी भागीदारी करारसंबंधित कागदपत्रे लागतात. तसेच, भागीदारी फर्मच्या अधिकृतता पत्राची प्रत जोडावी लागते. यासह जीएसटी क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक ही जोडावा लागतो.