व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू कशामुळे? पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये झाला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं काल कार अपघातात निधन झालं. अहमदाबादहून मुंबईला येत असताना हा अपघात झाला. त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यासाठी सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोले यांचा मृतदेह जेजे रुग्णालयात आणलं होता. अखेर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये त्यांच्या मृत्यूचे खरं कारण समोर आलं आहे. साइरस

सायरस मिस्त्री यांच्या पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. ज्याला वैद्यकीय परिभाषेत पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. जेजे रुग्णालय प्रशासनाने सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे यांचा शवविच्छेदन अहवाल कासा पोलिस स्टेशनला पाठवला आहे.

पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनायता पांडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने (डावीकडून) दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिचे पती, जेएम फायनान्शियलचे सीईओ डॅरियस पांडोले हे तिच्या शेजारी बसले होते. यावेळी गाडीचा वेग अजस्त होता. कारने 9 मिनिटांत 20 किमी अंतर कापले होते.

कोण होते सायरस मिस्त्री-

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुटुंबात झाला. प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमध्ये झाले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. सायरस मिस्त्री 2006 साली टाटा समुहाचे सदस्य बनले होते. तर 2013 ला वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. मात्र, 2016 साली त्यांना टाटाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.