हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या 2023 वर्षातला शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू आहे. थोड्याच दिवसांनी आपण नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करणार आहोत. तसेच, नवे संकल्प करत नव्या वर्षात नव्या इच्छा अपेक्षा घेऊन पुढे जाणार आहोत. परंतु पुढे जात असताना आपल्याला एकदा तरी मागील वर्षात घडलेल्या गोष्टींकडे नजर टाकण्याची गरज आहे. त्यामुळे 2023 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नक्की काय घडामोडी घडल्या या आपण जाणून घेणार आहोत.
राजकीय क्षेत्र –
2023 च्या सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यात, लेक लाडकी योजना सुरू करण्याचा निर्णय असो वा शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू करण्याचा निर्णय असो. अशा अनेक निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला फायदा झाला आहे. परंतु राज्य सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयामुळे या वर्षात सरकारने तरुणांची नाराजी केल्याचेही दिसून आले. त्याचबरोबर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे देखील 2023 वर्षे चांगलेच चर्चेत राहिले. सध्या, मराठा आरक्षणाचा पेटलेल्या मुद्दा बघता यंदाच्या वर्षात मराठा समाजाला नेतृत्वाचा चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील भेटल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या बाजूला राजकारणातील घडामोडी पाहिला गेलो तर, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडली. पक्षांतर्गत असलेल्या नाराजीमुळे अजित पवार गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षात मोदी आडनावावरून पडलेल्या वादामुळे राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली. जे न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निकालानंतर पुन्हा त्यांना देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या वर्षांमध्ये पाच राज्यांच्या पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 3 राज्यात घवघवीत यश मिळाले. तसेच , काँग्रेसने देखील तेलंगणामध्ये सत्ता स्थापित केली. 2023 च्या वर्षात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे अनेक आमदारांनी आणि खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्याचबरोबर भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची सर्व पक्षांनी एकत्र येऊन स्थापना केली. आता या इंडिया आघाडीचा 2024 चा राजकारणावर कसा परिणाम पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
क्रिडा क्षेत्र –
क्रीडा क्षेत्रामध्ये पाहिला गेलो तर 2023 च्या वर्षांमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अशा रंगलेल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताचा दणकून पराभव केला. त्यामुळे यंदाचे वर्ष भारतीय क्रिकेट संघाला फारसे चांगले केल्याचे दिसत नाही. परंतु, यंदाचे वर्ष विराट कोहलीसाठी नक्कीच आठवण येत राहील. कारण यांना विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पन्नास शतकांचा रेकॉर्ड मोडत नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे या वर्षात भारताला दुसरा सचिन तेंडुलकर मिळाल्या असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
आर्थिक क्षेत्र –
2023 वर्ष हे आर्थिक क्षेत्रासाठी देखील तितकेच महत्त्वाचे ठरले. शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढले तसेच अनेक वस्तूंच्या किमती महागत गेल्या आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची आर्थिक स्थिती सुधारेल अशी अनेक महत्त्वाची बजेट सादर केली. आता एक फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन या यूनियन बजट सादर करणार आहे. त्यामुळे या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटीचे तरतूद करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.