हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दोन महिन्यांपूर्वी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बीच विल्मोर हे अंतराळात गेलेले आहे. या आधी सुनीता विल्यम्स यांनी अनेक वेळा अंतराळातील प्रवास केलेला आहे. परंतु यावेळी त्या केवळ एका आठवड्यासाठी त्या दोघांना अंतराळात पाठवण्यात आलेले होते. परंतु केवळ आठ दिवसांसाठी गेलेले हे दोघे आज महिना झालेला आहे. तरीही स्पेस स्टेशनवरच अडकून राहिलेले आहेत. अचानक यानामध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्यांना तिथेच राहावे लागलेले आहे. तसेच अंतराळात हेलियमची गळती होत आहे. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर लगेच परतणे शक्य नाही. परंतु आता इथून पुढे 240 दिवस सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळात घालवावे लागणार आहे. तसेच नासाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये त्या दोघांनाही पृथ्वीवर आणणार आहे.
आठ दिवसासाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल आठ महिन्याचा अंतराळात राहणार आहेत. परंतु अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, अवकाशात राहून ते नक्की करणार तरी काय? अंतराळात राहिल्याने त्यांच्या जीवाला काही धोका होणार आहे का? त्यांच्या शरीरात कोणते बदल होणार आहे? तसेच अमेरिकेचे सरकार या अंतराळांसाठी किती खर्च करते याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
याबद्दलची माहिती नुकतेच नासाने दिलेली आहे सुनीता विल्यम्स आणि बुच हे स्टारलाइनर स्पेस प्लेनमधून अंतराळा स्थानकावर गेले होते. परंतु ते येताना कृशिवाय परत येतील. आठ दिवसांसाठी गेलेल्या या दोघांना आता अंतराळात आठ महिने राहावे लागणार आहे. या दोघांनाही फेब्रुवारी 2025 मध्ये स्पेस एक्स क्रूड ड्रॅगन यांना द्वारे पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. सप्टेंबरच्या शेवटी ते उड्डाणासाठी तयार होणार आहेत. या आधीच्या अंतराळवीर यामध्ये केलेले होते या आधी केवळ दोनच अंतराळवीर स्थानकावर गेलेले आहेत. या दोघांना पृथ्वीवर परतण्यासाठी यान पाठवले जाणार आहे.
शरीरावर काय परिणाम होणार ?
ओठाबाई युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे देखील म्हटले गेलेले आहे की, अंतराळात इतके दिवस राहिल्याने मानवाच्या शरीरातील जवळपास 50 टक्के लाल रक्तपेशी या नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता देखील होऊ शकते. आणि त्यांना स्पेस एनेमिया होऊ शकतो. आपल्या शरीरातील लाल पेशीय संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यामुळे मानवाला चंद्र मंगळ याच्या पलीकडे अंतराळ प्रवास करणे कठीण होते. तसेच त्यांच्या स्नायू कमकुवत होतात आणि हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता देखील जाणवणार आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळवीरांच्या शरीरातील दर सेकंदाला तीन दशलक्ष लाल रक्तपेशी नष्ट होतात. परंतु नंतर शरीर याची पूर्ण भरपाई करते. कारण लाल पेशी या त्याच दराने तयार होत असतात.
अंतराळवीर अंतराळ स्थानकावर काय करतात ?
याआधी स्कॉट केली या अमेरिकन अंतराळवीराला अंतराळात पाठवण्यात आलेले होते. तो तब्बल 340 दिवस अंतराळात होता. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांनी आयएसएसवर खूप काम केले होते. त्याला सकाळी सहा वाजता उठव लागतं. त्यानंतर त्यांनी एखादा प्रयोग करणे. स्पेस स्टेशनचे सदोष हर्डीकर दुरुस्त करणे किंवा स्पेस स्टेशनच्या देखील देखभालीकडे लक्ष देणे. यांसारखी कामे त्यांना करावी लागतात.