हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक इंडस्ट्रीत एक नवी चर्चा होताना दिसत आहे. कारण चिनी आय चॅटबॉट “डीपसीक” (DeepSeek) ने अँपलच्या अँप स्टोअरमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. यामुळे अमेरिकेत चॅटजीपीटीला मागे टाकत “डीपसीक”ने एक नवा इतिहास रचला आहे. डीपसीकच्या यशामुळे गुंतवणूकदारांमध्येही धक्काच बसला आहे, कारण एका दिवसात अमेरिकेतील दिग्गज टेक कंपन्यांचे एकत्रित 1 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
डीपसीकने ओपन एआयला मागे टाकण्याची किमया –
“ओपन एआय हा काही देव नाही आणि तो नेहमीच आघाडीवर असू शकत नाही,” अशी टिप्पणी डीपसीकच्या संस्थापक लियांग वेनफेंग यांनी जुलै 2024 मध्ये एका चिनी मीडिया आउटलेट 36 केआरला दिली होती. यानंतर अवघ्या काही महिन्यांत डीपसीकने ओपन एआयला मागे टाकण्याची किमया केली आहे. डीपसीक हे एक फक्त 20 महिने जुने स्टार्टअप असले तरी त्याच्या एआय असिस्टंटने जगभरातल्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी डीपसीकला शीतयुद्धाच्या काळातील “स्पुटनिक” मोमेंट म्हणून संबोधले आहे, ज्यामुळे एआयच्या नव्या युगाची भविष्यवाणी केली जात आहे.
लियांग वेनफेंग हे डीपसीकचे संस्थापक –
लियांग वेनफेंग हे डीपसीकचे (DeepSeek) संस्थापक असून , ते चीनमधील गुआंगोंग प्रांतात 1980 च्या दशकात वाढले. त्यांचे वडील प्राथमिक शाळेतील शिक्षक होते . झेजियांग विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. लियांग वेनफेंग यांनी डीपसीकच्या माध्यमातून चीनला एआय क्षेत्रात नेतृत्व मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे.
डीपसीकच्या संस्थापकांचे लक्ष –
लियांग यांचे म्हणणे आहे की, “जेव्हा ओपन एआयच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतवले, तेव्हा त्यांना रिटर्नच्या बाबतीत विचार करण्याचा कुठलाही विचार केला नाही . त्यांना फक्त त्यातली शक्ती आणि नवीनता पाहायची होती.” यावरून स्पष्ट होते की डीपसीकच्या (DeepSeek) संस्थापकांचे लक्ष केवळ आर्थिक फायद्यावर नाही, तर त्याच्या तंत्रज्ञानातील नवीनतेवर आहे.
हे पण वाचा : महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी!! 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी