Dry Ice नेमके काय असते? त्याला कसे बनवले जाते?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनरऐवजी कोरडा बर्फ (Dry Ice) खाल्ल्यामुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पाचही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र यातील 2 जणांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणानंतर या रेस्टॉरंटविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या घटनेमुळेच आता Dry Ice नेमके काय असते? ते खाल्ल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये सोमवारी Dry Ice खाल्ल्यामुळे रक्ताच्या उलट्या झाल्याची ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये डॉक्टरांनी सांगितले की, या सर्व लोकांनी Dry Ice खाल्ले होते. कार्बन डायऑक्साइडचे घनरूप आहे. खरे तर, हे कूलिंग एजंट म्हणून वापरले जाते. परंतु हे पाण्यापासून बनवलेले नसते. याचा वापर वैद्यकीय ते अन्न उद्योगापर्यंत सर्व ठिकाणी करण्यात येतो. हे Dry Ice खाणे तितकेच धोक्याचे ठरू शकते.

Dry Ice कसे बनते?

Dry Ice बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड 109 अंश फॅरेनहाइटवर थंड केला जातो. त्यामुळे हा वायू बर्फात रूपांतरित होतो. याचवेळी त्याचा आकार लहान किंवा मोठ्या तुकड्यांमध्ये बदलतो. प्रामुख्याने Dry Ice वैद्यकीय ते अन्न उद्योगात वापरले जाते. सोबत, फोटोशूट आणि थिएटरमध्येही याचा वापर केला जातो. कारण Dry Ice गरम पाण्यात टाकल्यानंतर त्यातून धूर येण्यास सुरुवात होते. यानंतर तो भाग बर्फासारखा दिसू लागतो.

Dry Ice धोकादायक असते का?

होय, Dry Ice खाणे शरीरासाठी धोकादायक असते. यामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू असतो. Dry Ice खाल्ल्यामुळे शरीरातील पेशी मरायला सुरुवात होते. हा Dry Ice एअर टाईट बॉक्समध्ये ठेवू नये असे देखील सांगण्यात येते. हाच
Dry Ice गुरुग्राममधील पाच लोकांनी खाल्ला होता. ज्यामुळे त्यांना नंतर उलट्यांचा त्रास झाला.