Voter Awareness: मतदान होण्यापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास काय होते? वाचा नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरातील विविध भागातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, एखाद्या व्यक्तीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर अशावेळी निवडणूक आयोग काय निर्णय घेत असेल. (Voter Awareness) तसेच मतदान झाल्यानंतर एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर तेव्हा कोणती भूमिका घेतली जात असेल? खरे तर, अशा घटना खूप कमी प्रमाणात घडतात. त्यावेळी निवडणूक आयोग महत्त्वाची भूमिका बजावते, तीच भूमिका नेमकी काय असते? आपण जाणून घेऊया.

निवडणूक आयोगाचा नियम(Voter Awareness)

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एखादा उमेदवाराचा मृत्यू झाला तर निकाल लागेपर्यंत वाट पाहिली जाते. परंतु मतमोजणीनंतर दुसरा उमेदवार विजयी झाला तर पुन्हा निवडणूक घेण्याची गरज पडत नाही पण ज्या उमेदवाराचा मृत्यू झाला आहे तो उमेदवार विजयी झाला तर निवडणूक रद्द केली जाते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. निवडणूक आयोग त्या मतदारसंघात फेरमतदान किंवा पोटनिवडणूक घेते. अशावेळी निवडून दिलेला उमेदवार लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही. महत्वाचे म्हणजे अशा जागेसाठी निवडणूक सहा महिन्यांच्या आत घ्यावी लागते.

मतदानापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास?

एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असेल किंवा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेली असेल तर त्या जागेची निवडणूक रद्द करण्यात येते. उदाहरण म्हणून सांगायचेच झाले तर, राजस्थानमध्ये 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांचा मृत्यू झाला होता. परंतु मृत्यू पूर्वी त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. (Voter Awareness) अशावेळी एका नवीन तारखेला निवडणूक घेतली जाते. ज्यामुळे पक्षाला दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याची संधी मिळते.