व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मधुमेह म्हणजे काय?? पहा लक्षणे आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या जगात अनेक जणांचा मधूमेह म्हणजेच डायबिटीस चा त्रास असल्याचे समजते. आपल्या भारतात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. मधुमेह नक्की कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याबाबत आपण जाणून घेऊया…

मधुमेह म्हणजे काय ??

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो.

मधुमेहाचे प्रकार-

१) टाईप १ मधुमेह
२) टाईप २ मधुमेह
३) गरोदर पणातील मधुमेह

मधुमेहाची लक्षणे-

सतत थकवा येणे
अचानक अशक्तपना जाणवने. तीव्र भूक लागने
प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी होणे
वारंवार लघवीला जाणे
सतत तहानलेले असणे
डोळ्यांचे विकार किंवा त्वचा विकार होणे
एखादी जखम भरून येण्यास खूप वेळ लागणे

मधुमेहाचे दुष्परिणाम

रक्तातील साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास आपल्याला मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जाऊ लागते. मधुमेहाचा वाईट परिणाम आपली किडनी, डोळे, हृद्य, मेंदू आणि नाड्यांवर होतो. डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येणे. डोळे जाऊन अकाली अंधत्व येणे, किडन्या निकामी होणे लकवा येणे असे अनेक गंभीर दुष्परिणाम यामुळे होतात.

मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका अधिक असतो. मधुमेहींतील हृदयविकार हा इतर हृदयविकारांपेक्षा वेगळा असतो. शक्यतो यात दुखणे जाणवत नाही. म्हणूनच अनेकदा ते लक्षात येत नाही. हृदयविकार टाळण्याकरिता जेवणात मेदाचे प्रमाण कमी असावे. तसेच वर्षातून किमान एकदा तरी हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे.