Naked Resignation म्हणजे काय? याचे फायदे-तोटे काय आहेत?? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारांमध्ये वाढ करत नसेल किंवा त्या कर्मचाऱ्याला कंपनीत काम करत असताना अनेक अडचणी जाणवत असतील तर तो कर्मचारी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ शकतो. या राजनाम्यामध्ये देखील तो विविध प्रकारांचा वापर करू शकतो. जसे की, दुसरी नोकरी मिळण्याअगोदरच कर्मचारी आपला राजीनामा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देऊ शकतो. यालाच Naked Resignation असेही म्हणले जाते. सध्याच्या स्थितीत अनेकजण Naked Resignation देण्यावर कल देत आहेत. त्यामुळेच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत कंपनी सोडायचे असेल तो दुसरी नोकरी लागण्यापूर्वीच Naked Resignation देऊन मोकळा होऊ शकतो. हा पर्याय कर्मचारी तेव्हाच निवडतो ज्यावेळी त्याला तणावपूर्ण कामातून तत्काळ सुटका हवी असते. परंतु असे केल्यामुळे कर्मचारी आणखीन अडचणीत देखील येऊ शकतो. Naked Resignation दिल्यानंतर आर्थिक अस्थिरता, बेरोजगारी, पुन्हा नोकरी शोधण्याचा अडचणी निर्माण होतात.

त्यामुळेच अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याने सर्वात प्रथम आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच, धोरणात्मक नेटवर्क करणे आणि नवीन नोकरी शोधणे गरजेचं आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला तर त्याला पुढील अडचणींना सामोरे जावे लागत नाही. यासह कोणतीही आर्थिक टंचाई जाणवत नाही