What is Nano Urea | नॅनो युरिया म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी हे कसे उपयुक्त आहे? वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

What is Nano Urea | आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतात चांगले उत्पन्न यावे. म्हणून शेतकरी वेगवेगळ्या खतांचा देखील वापर करतात. त्यामुळे पिकाला चांगले पोषण मिळते. आणि शेतकऱ्याचे उत्पादन देखील वाढते. सध्या शेतकऱ्यांमध्ये नॅनो या खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

परंतु अजूनही अनेक असे शेतकरी आहेत त्यांना या खताबद्दल माहित नाही. आज आपण नॅनो युरियाबद्दल जाणून घेणार आहे. हे एक प्रकारचे द्रवू पद्धतीचे खत आहे. याच्या वापरामुळे तुमच्या खर्चात देखील घट होतो. आणि उत्पादनावर खूप चांगला परिणाम येतो. त्याचप्रमाणे तुमच्या पिकाची गुणवत्ता सुधारते तर आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नॅनो युरिया म्हणजे काय ? | What is Nano Urea

नॅनो युरिया हे एक द्रव प्रकारचा खताचा एक प्रकार आहे. हा शेतकऱ्यांसाठी एक स्मार्ट शेतीचा सराव करण्यासाठी हवामान बदलता सामना करण्यासाठी चांगला पर्याय आहे. हे खत वनस्पतीची नायट्रोजनची आवश्यकता पूर्ण करते. आणि त्या वनस्पतीमधील जैव उपलब्ध आहे. त्यांचा इष्टकणांचा आकार वाढतो. त्यामुळे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ दाणेदार युरिया पेक्षा दहा हजार पट अधिक होते.

या खताची फवारणी कधी आणि कशी करावी

तज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार दोन ते चार मिली नॅनो युरिया प्रति लिटर पाण्यात मिसळून ते उभ्या पिकावर फवारणी करावी. यामध्ये तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला फळे, फुले, औषधी वनस्पती इत्यादी सगळ्या पिकांवर या युरियाचा आपण वापर करू शकतो. पहिली फवारणी पिकाची उगवण झाल्यानंतर तीस दिवसांनी करायची आणि दुसरी फवारणी पहिली फवारणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पिकाला फुले येण्यापूर्वी करावी.

नॅनो युरियाचे फायदे

  • नॅनो युरिया हे पिकाची नायट्रोजनची गरज पूर्ण करते . त्याचप्रमाणे पानांचे प्रकार संश्लेषण मुलांचा विकास प्रभावी मशागत आणि फांद्या वाढवण्यास मदत करते.
  • हे झाडांच्या आत नायट्रोजन आणि इतर पोषक तत्त्वांचे देखील सोशन वाढवते.
  • यामुळे पिकांच्या उत्पादनाची पोषक गुणवत्ता वाढते.
  • पीक उत्पादकता वाढवून आणि कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढते.
  • उच्च कार्यक्षमतेमुळे ते पारंपारिक युरियाची गरज पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक कमी करू शकते.
  • तुम्ही नॅनो युरियाची एक बाटली सहज साठवू शकता.
  • या युरियाचा वापर माती हवा आणि पाण्याची गुणवत्ता टिकून ठेवण्यास मदत करते.