हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांना बचत करण्याची सवय लागल्यामुळे गुंतवणूकीकडील कल मोठयाप्रमाणात वाढला आहे. या वाढत्या कलाचा विचार करून, सरकार वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. ज्यामूळे लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. सरकारने तुमच्यासाठी सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरु केले असून , यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या पैशांची मोठी वाढ झाली आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती पाहुयात .
सॉव्हरिन गोल्ड बाँड –
सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक प्रकारचा प्रमाणपत्र आहे, जो RBI द्वारा जारी केला जातो. यामध्ये गुंतवणूकदार सोन्याच्या ग्रॅमनुसार गुंतवणूक करतात. या योजनेंतर्गत 2.5% वार्षिक व्याज देखील दिले जाते, ज्याची रक्कम दर 6 महिन्यांनी वाटली जाते . सध्याच्या काळात भौतिक सोन्याच्या किमती सतत घसरत असल्याने, गुंतवणूकदारांनी सोन्याचे बाँड खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक फायद्याची मानली आहे. गेल्या 8 वर्षांत सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना 160 % नफा मिळाल्यामुळे ग्राहकांची यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा होत आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट –
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्त्वाखाली 2016-17 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची सुरुवात झाली. योजनेत भाग घेतलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला नफा मिळाला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 2016-17 या गोल्ड बाँड सिरिज-3 ने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षातील योजनेतील गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशांची रोख रक्कम अजून प्राप्त झाली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी 16 नोव्हेंबर 2024 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा मिळणार आहे.
योजनेचे यश
या योजनेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे आणि सरकारने यासाठी आतापर्यंत एकूण 72274 कोटी रुपये उभारले आहेत. सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या एकूण 67 हप्त्यांची प्रक्रिया पार पडली आहे. पण या योजनेच्या शेवटच्या हप्त्याची पूर्तता वेळेवर न झाल्यामुळे काही गुंतवणूकदारांना चिंता आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना एक आकर्षक गुंतवणूक पर्याय बनली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून नागरिक मोठा परतावा मिळवू शकतात.