नवरात्रोत्सवाला सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी पितृपक्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. तर हिंदू कॅलेंडरनुसार, नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा येतो. त्यापैकी शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा केली जाते. या काळात घटस्थापना करून दुर्गादेवीची 9 दिवस आराधना करण्यात येते. यावर्षी नवरात्रीचा सण हा विशेष मुहूर्तावर आला आहे. आज आपण याचं मुहूर्ताविषयी आणि नवरात्र सणाविषयी जाणून घेणार आहोत.

नवरात्रीला सुरूवात कधीपासून?

यावर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबर 2023 सुरु होत आहे. ती 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. तर शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते. या काळात भक्तलोक मनेभावे देवीची पूजा करतात.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

नवरात्री सणाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तर घटस्थापनेचा मुहूर्त 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:44 ते 12:30 असा आहे. या वेळेमध्येच भाविकांनी आपल्या घरात तसेच मंडपात घटस्थापना करावी. विशेष मुहूर्तावर घटस्थापना केल्यानंतर देवी प्रसन्न होईल.

नवरात्री उत्सव

चैत्र महिन्यामध्ये म्हणजेच नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. शैलपुत्री हा माता दुर्गे चा पहिला उतार आहे. देवी पार्वतीलाच शैलपुत्री असे म्हटले जाते. कारण तिचे वडील पर्वतराज हिमालय होते. त्यामुळे पहिल्या दिवशी शैलपुत्री हिची पूजा करण्यात येते. यानंतर, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा, पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता, सहाव्या दिवशी देवी कात्यायनी, सातव्या दिवशी देवी कालरात्री, आठव्या दिवशी देवी महागौरी आणि नवव्या देवी सिद्धिदात्री या आठ अवतारांची पूजा केली जाते.