शिवसेनेचं नवं चिन्ह कोणतं?? नार्वेकरांचे सूचक ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. याशिवाय उद्धव थाकत्र आणि शिंदे गटाला आता शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. उद्धव ठाकरेंची हा मोठा धक्का मानला जात आहे. धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार अशा चर्चा सुरु असतानाच आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी नव्या चिन्हांबाबत सूचक संकेत दिले आहेत.

मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत आमचं चिन्ह म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हंटल आहे. यावेळी त्यांनी फोटोच्या मागील बाजूला वाघाचा लोगो ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं नवं चिन्ह वाघ असणार का असच चर्चाना उधाण आलं आहे. नार्वेकर यांच्या या ट्विटला अनेक लाईक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत.

दरम्यान, धनुष्यबाण गोठवल्यांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणार असा एल्गार केला आहे. त्यामुळे आगामी लढाईसाठी ते सज्ज असल्याचे दिसते. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे. त्यानुसार 3 चिन्हांची निवड करून निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.