हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये दैनंदिन दिनचर्येत देवपूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, दररोज देवपूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर, दररोज देवपूजा केल्यामुळे घरामध्ये कोणतीही सकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी देवपूजा ही योग्य वेळेत आणि नियमानुसार करण्याची आवश्यकता असते. त्यासाठीच हे नियम आणि देवपूजेची योग्य वेळ आपल्याला माहीत असायला हवी.
देवपूजेची योग्य वेळ
ज्योतिषाच्या मते, सकाळ असो संध्याकाळ देव पूजेची वेळ कायम लक्षात ठेवली पाहिजे. हिंदू धर्मात देवी-देवतांची दिवसातून पाच वेळा पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. परंतु, इतर कामकाजांमुळे हिंदू कुटुंबांमध्ये देवपूजा दोनच वेळा केली जाते. ही देवपूजा ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत करावी. तसेच संध्याकाळी, सूर्यास्ताच्या एक तास आधीपासून आणि सूर्यास्तानंतर एक तासापर्यंतची वेळ देवपूजेसाठी योग्य मानले जाते.
देवपूजा करताना हे नियम पाळावी
असे म्हणतात की, संध्याकाळची पूजा रात्रीच्या वेळी कधीही करू नये. असे केल्याने देवांचा कोप होतो. ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करणे टाळावे. शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे शुभ नाही. असे केल्याने जीवनात वाईट परिणाम होऊ शकतात. हिंदू धर्मात तुळशीच्या पानांचा पूजा किंवा विधीमध्ये वापर करणे खूप शुभ मानले जाते, परंतु तुळशीची पाने संध्याकाळी तोडू नयेत किंवा संध्याकाळच्या पूजेमध्ये तुळशीची पाने वापरू नयेत.