काय आहे विवाह विमा? अशाप्रकारे घेता येतो फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोकांचा आरोग्य विमा किंवा इतर अनेक प्रकारचा विमा उतरवत असतात. या विम्याचे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. ही आर्थिक दृष्टिकोनातून तयार केलेली एक चांगली संकल्पना आहे. जीवनामध्ये कधी कुठली गोष्ट घडेल, हे सांगता येत नाही. अशा वेळी आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भविष्याचा विचार करून विमा घेणे खूप महत्त्वाचा असतो.

आजपर्यंत आपण आरोग्य विमा, पीक विमा यांसारखे विमाचे प्रकार पाहिलेले आहेत. परंतु तुम्ही कधी विवाह बद्दल ऐकले आहे का? हा देखील एक विम्याचा प्रकार आहे. सध्या अनेक लोक या विम्याचा उपभोग घेत आहे. आपल्या भारतामध्ये पाहायला गेले, तर सर्वाधिक खर्च हा लग्नामध्ये होत असतो. अनेक वेळा आई वडील त्यांच्या आयुष्यभराची पुंजी मुलांच्या लग्नासाठी खर्च करतात. परंतु कधी कधी अचानक अशा गोष्टी होतात की, लग्न सोहळा यांसारख्या गोष्टी रद्द होतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

अशावेळी तुम्ही काढलेला विवाह विमा तुमच्या उपयोगाला येईल आर्थिक दृष्टिकोनातून हा अत्यंत सुरक्षित आहे. आता हा विवाह विमाची संकलपणा काय आहे? त्याचे स्वरूप कसे आहे? त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे होतो? याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

विवाह विमा अत्यंत फायदेशीर विमा आहे. जर कोणत्याही कारणामुळे तुमचे लग्न रद्द झाले किंवा लग्नासाठी आणलेले दागिने चोरीला गेले किंवा एखादी कोणतीही आपत्ती आली तर तुम्ही या विवाह विमाच्या माध्यमातून त्याची भरपाई घेऊ शकता. जर तुम्ही 25000 रुपये आणि जीएसटी इतका प्रीमियर हप्ता भरला, तर तुम्हाला जवळपास 20 लाखांपर्यंतचे कव्हरेज मिळते. आता या विवाह विम्याचे अनेक प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊया.

लग्न सोहळा रद्द होणे किंवा पुढे ढकलणे

एखाद्या वेळेस कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते. अशावेळी आग लागते, किंवा वादळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली, इतर विवाह सोहळा रद्द करावा लागतो. किंवा स्थगित करावा लागतो. अशा वेळी हा विवाह विमा उपयोगी ठरतो.

लायबिलिटी

जर एखाद्याला दुखापत झाली किंवा तुमच्या संपत्तीचे काही नुकसान झाले, तर ते कवर करण्यासाठी विवाह विमा महत्त्वाचा ठरतो.

वेंडर कडून झालेले नुकसान

यामध्ये लग्नपत्रिकांचा खर्च, केटरर्स, लग्नाचा हॉल, सजावट बँडवाल्यांना आगाव रक्कम देणे, हॉटेल, ट्रॅव्हल तिकीट साठी रिझर्व यांचा समावेश होतो.

दागिने चोरी जाणे

लग्नामध्ये जर दागिन्यांची तुम्ही भरपूर खरेदी केली असेल, परंतु एखाद्या वेळेस लग्नात दागिने चोरीला गेले किंवा हरवले तर या विम्यातून तुम्ही ती रक्कम कव्हर करू शकता.