हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणाऱ्या WhatsApp चे जगभरात आणि भारतात सुद्धा करोडो यूजर्स आहेत. व्हाट्सअप अतिशय सोप्प आणि मजेशीर असल्याने दिवसेंदिवस त्याचे यूजर्स वाढतच आहेत. मात्र कालच व्हाट्सअपने भारतातील जवळपास ७० लाख अकाउंट्स बॅन केले होते. पॉलिसीच्या उल्लंघनाबाबत कंपनीने ही कारवाई केली आहे त्यामुळे अनेक वापरकर्त्यांची निराशा झाली आहे. WhatsApp अकाउंट बॅन झाल्यानंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्न निर्माण होतोय. तुमच्या बाबतीत सुद्धा हे घडलं असेल तर चिंता करू नका. तुमचं अकाउंट पुन्हा सुरु कस करायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो.
सर्वात आधी तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट डिलीट करा.
त्यानंतर ॲप स्टोअरवरून पुन्हा WhatsApp ॲप डाउनलोड करा.
यानंतर, 3-6 अंकी सुरक्षा कोड वापरून WhatsApp वर तुमचा नंबर रजिस्टर करा .
ही पद्धत नेहमी काम करेलच असं नाहीपरंतु तुम्ही तुमच्या WhatsApp खात्याचे पुनरावलोकन करण्याची विनंती अशा प्रकारे सबमिट करू शकता.
दुसरा पर्याय कोणता?
व्हॉट्सॲपच्या Help center ( https://faq.whatsapp.com/ ) या लिंकवर जाऊन सर्वात खाली Contact us येथे जाऊन आपली तक्रार नोंदवावी.
अकाउंट बॅन झालेले असल्यास Grievance Officer सोबत मेलद्वारे संपर्क साधावा. त्याठिकाणी आपली योग्य तक्रार करावी.
Two factor authentication कायम सुरु ठेवावे.
Recovery ऑप्शन्ससाठी ईमेल, दुसरा मोबाईल नंबर देऊन ठेवावा.
तुमचं अकाऊंट बॅन न होण्यासाठी काय करावं?
कोणालाही अश्लील किंवा धमकीचे मेसेज पाठवू नका.
जेव्हा व्हाट्सअप वर तुम्हाला अनोळखी नंबरवरून संशयास्पद लिंक आल्यास त्यावर कधीच क्लीक करून ती लिंक ओपन करू नका.
जेव्हा तुम्हाला असे संशयास्पद मेसेज येईल तेव्हा ते कोणाला फॉरवर्ड करू नका
टेलीमार्केटिंग आणि संलग्न विपणनासाठी मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवू नका. अशा कामांसाठी तुम्ही बिझनेस व्हाट्सअप अकाउंटचा वापर करू शकता.