Whatsapp Ban : 1 जूनपासून ‘या’ 14 Mobile वर Whatsapp बंद पडणार

Whatsapp Ban
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Whatsapp Ban। Whatsapp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स असून व्हाट्सअपच्या माध्यमातून आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत चॅटिंग करणं, फोटो विडिओ शेअर करणे, गाणी शेअर करणे अशी अनेक कामे करता येतात. आजकाल व्हाटसप वरून पैसेही पाठवता येतात. त्यामुळे जगात जवळपास सर्वच मोबाईल यूजर्स व्हाट्सचा वापर करतात. पण आता Whatsapp काही मोबाईल मधून आपला सपोर्ट काढून घेणार आहे. म्हणजेच काय तर काही मोबाईल मधून व्हाट्सअप बंद होणार आहे. उद्यापासून म्हणजेच १ जूनपासून हि प्रक्रिया सुरु होणार आहे.

कोणकोणत्या मोबाईल मधून बंद होणार व्हाट्सअप? Whatsapp Ban

iPhone 5s
iPhone 6
iPhone 6 Plus
iPhone 6s
iPhone 6s Plus
iPhone SE (1st gen)
Samsung Galaxy S4
Samsung Galaxy Note 3
Sony Xperia Z1
LG G2
Huawei Ascend P6
Moto G (1st Gen)
Motorola Razr HD
Moto E 2014

मेटाच्या मते, असा निर्णय घेण्यामागच (Whatsapp Ban) महत्वाचं कारण म्हणजे सुरक्षा… जुन्या मोबाईलला आता सॉफ्टवेअर अपडेट्स मिळत नाहीत. त्यामुळे मोबाईल हॅक होण्याचा धोका असतो. म्हणूनच व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सना नवीन हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमवर जाण्यास सांगत आहे.अलीकडेच व्हॉट्सअॅपने चॅट लॉक, कंटेंट कॉपी रोखण्यासाठी फीचर आणि मेसेज ऑटो-डिलीटसाठी चांगल्या सेटिंग्ज यासारखे अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत. ही फीचर्स फक्त नवीन ऑपरेटिंग सिस्टीम वरच चांगल्या प्रकारे काम करतात.

जर तुम्ही iOS 15.1 किंवा Android 5.1 किंवा त्यावरील व्हर्जन वापरत असाल, तर तुमचं WhatsApp सुरूच राहील. परंतु जर तुमचा मोबाईल अपडेट होत नसेल तर नवीन मोबाईल घेण्यापूर्वी WhatsApp डेटाचा बॅकअप घ्या. यासाठी, WhatsApp ओपन करा. त्यानंतरSettings > Chats > Chat Backup वर जा, Google Account वरून बॅकअप घ्या. यामुळे तुमचे आत्तापर्यंतचे संपूर्ण व्हाट्सअप चॅटिंग एका क्लिकवर नवीन मोबाईल मध्ये ट्रान्सफर केले जातील.