WhatsApp चा भारताला दणका!! 22 कोटींहून अधिक अकाउंट केले बॅन

WhatsApp Account Ban
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स आहेत. कंपनी सतत व्हाट्सअपमध्ये नवनवीन फीचर्स ऍड करत यूजर्सचा अनुभव द्विगणित करत असते. मात्र आता याच व्हाट्सअपने भारतातील वापरकर्त्यांचे तब्बल 22 कोटींहून अधिक अकाउंट बंद केली आहेत. व्हॉट्सॲपने पॉलिसीच्या उल्लंघनाबाबत ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत हा आकडा दुप्पट आहे. हे आकडे सायबर घोटाळ्यांच्या वाढत्या प्रकरणांमुळे सुद्धा वाढले असावेत.

WhatsApp च्या मासिक अहवालानुसार, या भारतीय WhatsApp खात्यांवर कारवाई माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 च्या नियम 4(1)(d) आणि नियम 3A(7) अंतर्गत करण्यात आली आहे. व्हाट्सअपने आत्तापर्यंत जे जे अकाउंट बॅन केले त्यामध्ये अनेक स्पॅमिंग अकाउंट आणि चुकीची कामे करणारी होती. एवढच नव्हे तर अश्लील मेसेज करणारे, धमकीचा मेसेज करणाऱ्या अकाउंटचा यामध्ये समावेश आहे. भारतात सुमारे 53 कोटी लोक व्हॉट्सॲप वापरतात. त्यातील तब्बल 22 कोटी अकाउंट बॅन करण्यात आल्याने ही मोठी कारवाई म्हणता येईल.

तुमचं अकाऊंट बॅन न होण्यासाठी काय करावं?

कोणालाही अश्लील किंवा धमकीचे मेसेज पाठवू नका.
जेव्हा व्हाट्सअप वर तुम्हाला अनोळखी नंबरवरून संशयास्पद लिंक आल्यास त्यावर कधीच क्लीक करून ती लिंक ओपन करू नका.
जेव्हा तुम्हाला असे संशयास्पद मेसेज येईल तेव्हा ते कोणाला फॉरवर्ड करू नका
टेलीमार्केटिंग आणि संलग्न विपणनासाठी मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवू नका. अशा कामांसाठी तुम्ही बिझनेस व्हाट्सअप अकाउंटचा वापर करू शकता.