हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आतापर्यंत व्हाट्सअप युजर्सला व्हाट्सअप कोणत्याही एका डिव्हाइसवर वापरता येत होते. मात्र आता हेच व्हाट्सअप युजर्सला एकूण चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर एकाच वेळी वापरता येणार आहे. यामुळे फोन बंद असला तरी युजर्सची चॅट आणि डेटा सुरक्षित राहील. तसेच, विविध डिव्हाइसवरून व्हाट्सअप ऑपरेटर करता येईल. याचा फायदा सतत डिव्हाइसवर काम करणाऱ्या व्यक्तींना होईल, असेम्हणले जात आहे.
या 4 डिव्हाइसवर व्हाट्सअप वापरता येईल
युजर्सला एकाचवेळी डेस्कटॉप, स्मार्टवॉच, व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट, टॅब्लेट या डिव्हाइसवर वापरता येणार आहे.
विविध डिव्हाइसवर व्हाट्सअप वापरण्याची पद्धत
Android यूजर्स
- सर्वात प्रथम फोनवर WhatsApp उघडा आणि सेटिंगमध्ये जावा.
- “लिंक्ड डिवाइसेस” वर टॅप करून “लिंक डिवाइस” पर्याय निवडा.
- तुम्हाला जो डिव्हाइस लिंक करायचा आहे तो फोनच्या समोर ठेवा आणि दाखवलेला QR कोड स्कॅन करा.
iPhone यूजर्स
- अँड्रॉइड फोनसाठी दिलेल्या सूचनेप्रमाणे “लिंक अ डिवाइस” वर जावा.
- आयफोन ज्या डिव्हाइसशी लिंक करायचा आहे तो समोर ठेवा. आणि QR कोड स्कॅन करा.
डेस्कटॉप यूजर्स
- तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
- सेटिंग्जमध्ये जाऊन लिंक्ड डिवाइसेस निवडा.
- यानंतर ब्राउझरवर WhatsApp उघडा.
- पुढे एक विंडो QR कोडसह उघडेल. तो कोड फोनने स्कॅन करा. थोडा वेळा डिव्हाइस सिंक वाट पहा.
स्मार्टवॉच यूजर्स:
- प्रथम Wear OS स्मार्टवॉचवर WhatsApp उघडा.
- तुमच्या स्क्रीनवर 8 अंकी कोड दिसेल.
- पुढे तुमचे मुख्य व्हाट्सअप डिव्हाइस घ्या आणि आठ-अंकी कोड एंटर करा.