हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगतभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स आहेत. आपल्या यूजर्सना नवनवीन काहीतरी मिळावं, त्यांना चांगला अनुभव यावा यासाठी व्हाटसप नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनी यूज़र्सच्या प्रायव्हसी साठी आणखी एक फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. व्हाट्सअपच्या या नव्या फीचर्समुळे तुमचं चॅटिंग आणखी सेफ राहणार आहे. WABetaInfo ने गेल्या आठवड्यात एका अहवालात म्हटले आहे की, WhatsApp अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी चॅट प्रायव्हसी फीचर डेव्हलप करत आहे. हे फीचर अँड्रॉइड २.२५.१०.१४ साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये दिसले. आता कंपनी आयफोनसाठीही हे फीचर आणणार आहे. याबाबतचा एक स्क्रिन शॉट सुद्धा शेअर करण्यात आला आहे.
शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही हे फीचर पाहू शकता. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर चॅट इन्फो स्क्रीनमध्येच एक नवीन प्रायव्हसी ऑप्शन देतेय. हा ऑप्शन यूजर्सना वैयक्तिक आणि ग्रुप चॅटसाठी ऍडव्हान्स लेव्हलची सिक्युरिटी देतेय. या फिचर अंतर्गत, जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले तरी पुढच्या मेंबरच्या मोबाईल मध्ये ते ऑटोमॅटिक सेवा होणार नाहीत.
📝 WhatsApp beta for iOS 25.10.10.70: what's new?
— WABetaInfo (@WABetaInfo) April 6, 2025
WhatsApp is working on an advanced chat privacy feature to limit message sharing, and it will be available in a future update!https://t.co/WeoPglqZfR pic.twitter.com/4sVzeHrpV7
आणखी एक गोष्ट म्हणजे व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचर्स मुळे तुमची संपूर्ण चॅट हिस्ट्री एक्स्पोर्ट सुद्धा करता येत नाही… म्हणजेच काय तर तुमची कोणाशी काय चॅटिंग केलं ते आता तिसऱ्या व्यक्तीशी शेरा करता येणार नाही. तुमचा डेटा यामुळे कुठेही लीक होणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे सिक्युर व्हाल. व्हाट्सअपचे हे नवे फीचर्स त्या यूजर्स साठी बेस्ट आहे ज्यांना असं वाटत कि आपलं चॅटिंग कुठेही व्हायरल होऊ नये, शेअर होऊ नये किंवा कोणाच्या मोबाईल मध्ये सेवा होऊ नये. व्हॉट्सअॅपचे हे फीचर पूर्णपणे ऐच्छिक असेल. यूजर्स प्रत्येक चॅटसाठी ते वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज करू शकतील. लवकरच हे फिचर आपल्या यूजर्स साठी लाँच होईल.