हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पेक्षा व्हाट्सअप वापरायला सोप्प आणि अधिक उपयुक्त असल्याने अगदी युवकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण व्हाट्सअपचा आनंद घेत असतात. कंपनी सुद्धा सतत व्हाट्सअप मध्ये नवनवीन फीचर्स लाँच करत ग्राहकांना वेगळेपण देत असते. आताही व्हाट्सअप अशाच एका नव्या फीचरवर काम करत आहे. फेव्हरेट्स – चॅट्स टॅब असे या फिचरचे नाव असून आवडत्या कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप्सना फिल्टर करेल आणि तुम्हाला ते शोधण्यास मदत होईल.
व्हॉट्सॲपच्या आगामी वैशिष्ट्यांचा मागोवा घेणारी वेबसाइट Wabetainfo ने सांगितले की, सध्या हे फीचर्स डेव्हलोप केलं जात आहे. Wabetainfo ने सांगितलं की WhatsApp एका कस्टम चॅट फिल्टर फीचरवर काम करत आहे, जे आवडत्या कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप्सवर काम करेल. या नव्या फिचरच्या मदतीने व्हॉट्सॲप यूजर्स त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या चॅटिंगमध्ये सहज प्रवेश करू शकतील. आजकाल व्हॉट्सॲपमध्ये अनेक चॅट्स आणि ग्रुप्स आहेत. अशा परिस्थितीत, एखाद्याला आवडते चॅट पुन्हा पुन्हा शोधावे लागते, परंतु या फीचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या ग्रुप आणि वैयक्तिक चॅट्समध्ये सहज प्रवेश करू शकतील. सध्या हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी डेव्हलोपमेन्ट स्टेजवर आहे.
या फिचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना एक समर्पित फिल्टर मिळेल. या फिल्टरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवडत्या चॅटमध्ये सहज प्रवेश करू शकतील. यूजर्स फेव्हरेट फिल्टरच्या मदतीने चॅट निवडू शकतात किंवा सेटिंग्जमध्ये जाऊन आवडते चॅट मार्क करू शकतात. वापरकर्त्यांनी डेडिकेटेड फिल्टर फेव्हरेटवर क्लिक करताच, वापरकर्ते त्यांच्या आवडत्या चॅटमध्ये सहज प्रवेश करू शकतील