भारतात WhatsApp सह Facebook, Instagram ॲप्स बंद होणार? नेमके कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला संपूर्ण जगभरातून Facebook, Instagram आणि WhatsApp वापरकर्त्यांची संख्या करोडोंच्या घरात पोहचली आहे. तसेच या संख्येत दिवसेंदिवस वाढ ही होत चालली आहे. परंतु अशा काळातच भारतामध्ये लवकरच Facebook, Instagram आणि WhatsApp बंद होईल, या चर्चांनी जोर धरला आहे. सांगितले जात आहे की, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन प्रायव्हसी या फीचरमुळे WhatsApp भारतात बंद होऊ शकते. कारण, हे फीचर भारत सरकारच्या 2021 माहिती तंत्रज्ञान नियमांच्या विरोधात चालवले जात आहे. खरे तर, यामागे इतरही अनेक महत्त्वाची कारणे आहेत, ज्यामुळे Facebook, Instagram आणि WhatsApp भारतातून हद्दपार होऊ शकते. हीच कारणे आपण जाणून घेणार आहोत.

ही आहेत प्रमुख 5 कारणे

1) WhatsApp ने म्हणले आहे की, जर भारत सरकारकडून एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर काढून टाकण्यासाठी दबाव असेल तर आम्ही भारतातून बाहेर पडू.

2) सध्या आयटी नियम 2021 च्या नियम 4 (2) अंतर्गत भारत सरकार आणि WhatsApp ध्ये हा सर्व वाद सुरू आहे. 2021 च्या नियम 4 नुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मेसेज आधी कोणी आणि कुठून पाठवला याची माहिती द्यावी लागेल. यालाच Meta ने आव्हान दिले आहे.

3) याबाबत WhatsApp ने न्यायालयात सांगितले होते की, व्हायरल झालेल्या बातम्यांबाबत यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. परंतु यात वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारांतर्गत कंपनी त्याचे एंड टू एंड एन्क्रिप्शन काढू शकत नाही. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आहे. जर WhatsApp भारतात बंद झाले तर त्यामागे Facebook आणि Instagram हे अँप्स देखील बंद होतील.

4) महत्वाचे म्हणजे, भारतात सर्वात केंद्रस्थानी असलेल्या ॲपमध्ये WhatsApp चा समावेश आहे. आकडेवारीनुसार पाहिला गेलो तर, जगभरात व्हाट्सअपचे 2.78 अब्ज वापरकर्ते आहेत. या आकडेवारीत सर्वाधिक भारतीय वापरकर्त्यांचा समावेश आहे. यामध्ये मेटासाठी भारत सर्वात महत्वाचे आहे. कारण की, 535.8 दशलक्ष भारतीय वापरकर्ते मेटाशी जोडले आहेत.

5) WhatsApp हे ॲप फेब्रुवारी 2009 मध्ये लाँच करण्यात आले होते. व्हाट्सअपच्या पहिल्या व्हर्जनमध्ये अनेक क्रॅशिंग समस्या होत्या, त्यामुळे पुन्हा WhatsApp 2.0 ऑगस्ट 2009 मध्ये iPhone द्वारे लाँच करण्यात आले. त्यावेळी ते 250000 लोकांनी डाउनलोड केले होते, पुढे WhatsApp ॲप Android वापरकर्त्यांसाठी ही उपलब्ध करण्यात आले. आता याचं WhatsApp ॲपचे भारतात करोडोपेक्षा अधिक वापरकर्ते बनले आहेत. अशा काळात व्हॉट्सॲप भारतात बंद झाले तर याचा फटका दोन्ही बाजूंना बसू शकतो.