WhatsApp Feature : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प असल्याने युवकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वच जण व्हाट्सअपचा वापर करत असतात. व्हाट्सअप नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर लाँच करत असते. वापरकर्त्यांचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी कंपनी प्रयत्नशील असते. आताही व्हाट्सअप एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे तुम्ही चॅटिंग फिल्टर करू शकता. म्हणजेच जुने चॅट शोधताना तुमचा जास्त वेळ जाणार नाही.
अनेकदा तुमच्या व्हाटसअप मध्ये अनावश्यक मेसेजचा भरणा पाहायला मिळतो. त्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीचे चॅटिंग खाली जाते. व्हाट्सअपने आवडीच्या संपर्काना पिन करण्याचा पर्याय दिला आहे, मात्र फक्त ३ च लोकांना तुम्ही पिन करू शकता. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲप नवीन कस्टम चॅट फिल्टर फीचरवर काम करत आहे. या नवीन फिल्टरसह, व्हाट्सअप यूजर्स त्यांच्या आवडत्या संपर्कांवर आधारित चॅट्स फिल्टर करू शकतील. त्यामुळे सदर चॅट तुम्ही अगदी सहजपणे पाहू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे हे फीचर (WhatsApp Feature) व्हॉट्सॲप वेबवरही काम करेल.
फीचर कधी येणार? WhatsApp Feature
सध्या हे चॅट फिल्टर फीचर्स डेवलपमेंटच्या टप्प्यात आहे. हे फीचर्स बीटा व्हर्जनमध्ये येण्यासाठी आणि नंतर प्रत्येकासाठी उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, या फीचर्स सोबत आपले आवडते संपर्क मार्क करण्याचे फीचर्स देखील डेव्हलप केले जात आहे आणि येत्या काळातील अपडेट मध्ये समाविष्ट केले जाण्याची अपेक्षा आहे.