आता Voice Message वाचताही येणार; WhatsApp आणतयं भन्नाट फीचर्स

whatspp feature voice message
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांना फोटो, विडिओ, ऑडिओ सह अनेक गोष्टी शेअर करू शकतो. आजकाल अनेक पर्सनल कामे सुद्धा व्हाट्सअपच्या माध्यमातूनच केली जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप असतंच. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. ज्यामुळे यूजर्सना नवनवीन अनुभव मिळत असतो. आताही व्हाट्सअपमध्ये एक भन्नाट फिचर येणार आहे ज्यामध्ये Voice Message चे रूपांतर Text Message मध्ये करता येणार आहे. म्हणजे तर कोणाचा Voice Message आला आणि तुम्हाला तो ऐकायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याचे Text मध्ये रूपांतर करून तो मेसेज वाचू शकाल.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपवर वापरकर्त्यांना लवकरच व्हॉईस नोट्स ट्रांसक्राइब करण्याची सुविधा मिळेल. हे फीचर सुरू केल्यानंतर, युजर्सना कोणताही व्हॉइस मेसेज ट्रांसक्राइब करण्यासाठी कोणत्या थर्ड पार्टी अँपची गरज लागणार नाही. व्हॉट्सॲपचे नवीन फीचर सध्या डेव्हलपमेन्टच्या टप्प्प्यात असून लवकरच ते यूजर्ससाठी उपलब्ध होईल. जे लोक व्हॉइस मेसेज ऐकण्याऐवजी वाचणे पसंत करतात त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरेल. एवढच नव्हे तर तुम्ही प्रत्येक व्हॉइस संदेशासाठी वेगळी भाषा निवडू शकता. तुम्ही हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि रशियन यांसारख्या भाषांमध्ये त्यांचे ट्रांसक्राइब करू शकाल. भविष्यात यामध्ये आणखी काही नवीन भाषा केल्या जाऊ शकतात. मात्र हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, यूजर्सना भाषा विशिष्ट पॅकेज डाउनलोड करावा लागेल.

video call साठीही व्हाट्सअपचे नवीन फीचर्स –

मागील काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपने विडिओ कॉलबाबत सुद्धा नव्या फीचर्सची घोषणा केली होती. त्यानुसार तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त 32 व्हिडिओ कॉलमध्ये ऍड करू शकता. तुम्ही व्हिडिओ कॉलवर तुमची स्क्रीन शेअर करताना तुमचा आवाज शेअर करू शकता. तसेच जेव्हा व्हिडिओ कॉलवर बरेच लोक असतात, तेव्हा प्रत्यक्षात कोण बोलत आहे हे समजणे अवघड होते. यावर उपाय म्हणून WhatsApp आता बोलणाऱ्या व्यक्तीला इतर सर्वांच्या वर ठेऊन हायलाइट करून दाखवेल.