WhatsApp Feature : आता तारखेनुसार शोधा WhatsApp वरील जुने मेसेज; लाँच झालं भन्नाट फिचर

WhatsApp Feature Search By Date
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

WhatsApp Feature : WhatsApp या प्रसिद्ध सोशल मीडियाचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. व्हाट्सअप वापरत असताना आपल्या यूजर्सना अतिशय सोप्प्या पद्धतीने ते हाताळता यावं यासाठी मेटा कंपनी सतत यामध्ये नवनवीन फीचर्स ऍड करत असते. आताही कंपनीने आपल्या यूजर्स साठी एक भन्नाट फिचर आणलं आहे. व्हाट्सअप सर्च बाय डेट असे या फीचर्सचे नाव असून यामुळे तुम्हाला कोणत्याही जुन्या चॅटमध्ये पाठवलेले मेसेज सहज सापडतील. या फिचरमुळे जुने मेसेज पाहताना यूजर्सचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. हे फीचर्स नेमकं कस वापरायचं हे आज आपण जाणून घेऊयात..

खरं तर व्हाट्सअप वरील जुने मेसेज, फोटो किंवा विडिओ शोधायचं म्हंटल तर खूप वेळ जातो, आधी सदर कॉन्टॅक्टच्या चॅट हेड मध्ये जाऊन आपल्याला स्क्रोल कारण लागत. यामध्ये वेळही खूप जातो. म्हणून यावर उपाय म्हणून मटाने सर्च बाय डेट फिचर (WhatsApp Feature) आणलं आहे. कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्गने स्वतः एक विडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या नव्या फिचरमुळे व्हॉट्सॲपवर तुम्हाला कोणत्याही जुन्या चॅटमध्ये पाठवलेले मेसेज सहज सापडतील.हे फीचर यापूर्वी आयओएएस, मॅक डेक्सटॉप आणि व्हॉट्सअप वेब या ठिकाणी लागू होतं. आता याचा लाभ Android यूजर्सना देखील घेता येणार आहे.

कसे वापराल व्हाट्सअपचे हे फिचर – WhatsApp Feature

सर्वात आधी सदर ग्रुप किंवा वयक्तिक चॅट हेड ओपन करा.
सर्वात वर सर्च आयकॉन वर टॅप करा.
आता तुम्हाला तेथे कॅलेंडर आयकॉन देखील दिसेल.
कॅलेंडर आयकॉनवर टॅप करून तुम्हाला हवी असलेली तारीख निवडा.
यानंतर तुम्ही निवडलेल्या तारखेचे सर्व मेसेज तुमच्या समोर येतील.
या फिचरचा वापर करून तुम्हाला जुने विडिओ, फोटो, कागदपत्रे शोधण्यास मदत होईल आणि तुमचा वेळ वाचेल.