WhatsApp Feature | सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये झालेले आहेत. परंतु त्यातील व्हाट्सअप हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जे केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक लोक वापरत आहेत. व्हाट्सअप हे वापरण्यासाठी अगदी सरळ सोपे आणि साधे आहे. त्यामुळे अनेक लोक व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअप युजर्सला नवनवीन अनुभव देण्यासाठी तसेच व्हाट्सअप आणखी सोपे करण्यासाठी कंपनी नेहमीच व्हाट्सअपचे फीचर्स अपडेट (WhatsApp Feature) करत असते. नुकतेच कंपनीने तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी चेकअप नावाचे एक फीचर आणलेले आहे. यामध्ये कंपनी आता तुमची प्रायव्हसी आणखी जपत आहे. आणि पुढच्या स्तरावर देखील येत आहे. त्यामुळे मोठ्या बदल करणार आहे. ज्याच्या मदतीने तुमचा फोन नंबर देखील अगदी सुरक्षित राहणार आहे. म्हणजे ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही त्या लोकांपासून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लपवू शकता. म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर दिसणार नाही. आता हे अपडेट एक खूपच आश्चर्यकारक आहे. परंतु आता हे नेमके कसे होणार आहे? याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
खरंतर एका रिपोर्टमध्ये असे म्हटलेले आहे की whatsapp ही कंपनी लवकरच त्यांच्या सगळ्यात मोठे अपडेट लॉन्च करणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर एखाद्याशी whatsapp वर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्या व्यक्तीशी तुमचा मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरऐवजी तुमच्या एखादा यूजर नेम सेट करू शकता. ज्यामुळे तुमचा मोबाईल नंबर कुठेही जाणार नाही. टेलिग्रामवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे. परंतु आता हे फीचर व्हाट्सअपवर देखील येणार आहे.
नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये या फीचरचा (WhatsApp Feature) एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये तुमचे हे फीचर्स कसे काम करणार आहे? हे देखील सांगण्यात आलेले आहे. अनेक लोक व्हाट्सअपवर तुमच्याशी संपर्क साधू शकतील. परंतु त्या सगळ्या लोकांशी तुमचा मोबाईल नंबर शेअर करण्याची काही गरज नाही. यामुळे तुमची प्रायव्हसी देखील जपली जाणार आहे. अजून हे फीचर लॉन्च झालेले नाही. कारण या फीचरची अजून चाचणी चालू आहे. ही चाचणी एकदा सर्व प्रकारे यशस्वी झाली की लवकरच ते आणले जाईल अशी माहिती आलेली आहे.
व्हाट्सअपने याआधी देखील त्यांच्या युजरसाठी अनेक फीचर लॉन्च केलेले आहे. ज्याचा फायदाच लोकांना झालेला आहे. व्हाट्सअपची सगळ्यात खासियत म्हणजे व्हाट्सअप आपल्या प्रायव्हसीला जास्त प्राधान्य देते
त्यामुळेच आज जगभरात whatsapp चे युजर्स आहेत. या व्हाट्सअपवर आपण इन्स्टंट मेसेज करू शकतो. अगदीच व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकतो. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करायचे असेल, तर तेही करता येतील. त्यामुळे हे अत्यंत रोजच्या वापरातील ॲप झालेले आहे. त्यामुळे व्हाट्सअपवर येणारे नवनवीन फीचर देखील युजर्स अगदी आनंदाने स्वीकारत आहेत आणि त्यांचा वापर देखील करत आहेत.