WhatsApp Features : WhatsApp घेऊन येतंय नवं फीचर्स; कपल्ससाठी आहे फायदेशीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

WhatsApp Features । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहे. वापरायला अतिशय सोप्प आणि वेगवगेळ्या फीचर्सने परिपूर्ण असलयाने तरुणांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण व्हाटसपचा वापर करतात. सुरुवातीला फक्त चॅटिंग आणि फोटो व्हिडिओ शेअर करण्यासाठी व्हाट्सअप चा वापर व्हायचा. पण आता आपण आपली अनेक कामे व्हाट्सअप वरून करू शकतो. एवढच नव्हे तर एकेमकांना पैसेही पाठवू शकतो. यूजर्सना अजून लाभ मिळाला आणि व्हाट्सअप वापरताना मजा यावी यासाठी कंपनी सतत वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असते. आताही Meta अशाच एका फीचर्स वर काम करत आहे.

खरं तर WhatsApp कोणत्याही फिचर्सला (WhatsApp Features) रिलीझ करण्यापूर्वी त्याच टेस्टिंग करत असते. करते, त्यानंतर बीटा व्हर्जनेचे काही निवडक वापरकर्ते व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्सचा वापर करून हे फीचर्स कस वर्क होतय? त्यामुळे काय फायदा होतो? याबाबत योग्य फीडबॅक देते. यानंतर काही बदलांची आवश्यकता लाभल्यास त्याप्रकारचे बदल व्हॉट्सॲप करते किंवा नाहीतर मग फीचर्स रोल आऊट करते. यावेळी व्हॉट्सॲपने एका अनोख्या फीचरची चाचणी सुरू केली आहे. हे फीचर्स खास करून कपल्स ना जास्त फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

काय आहे व्हाट्सअपचे नवं फीचर्स – WhatsApp Features

व्हाट्सअप च्या या नव्या फीचर्सचे नाव फेव्हरेट कॉन्टॅक्ट (Favorite contact) असं आहे. या फीचर्स द्वारे व्हॉट्सॲप तुम्हाला तुमच्या आवडत्या संपर्काबद्दल विचारेल. म्हणजेच व्हॉट्सॲपने तुम्हाला विचारले की तुमचा आवडता संपर्क कोणता आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कॉन्टॅक्ट चे नाव सांगाल त्या नंबरला तुम्ही सहज कॉल किंवा मेसेज करू शकाल. व्हॉट्सॲपची माहिती देणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने या फीचरची माहिती दिली असून त्यांच्या वेबसाइटनुसार कंपनीने हे फीचर फक्त iOS च्या बीटा व्हर्जनसाठी जारी केले आहे. म्हणजेच सध्या कंपनी फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी हे फीचर आणणार आहे.अँड्रॉइड यूजर्स साठी हे फीचर्स सध्या तरी आणण्यात येणार नाही.