WhatsApp Features : मोबाईल नंबर लपवून करा WhatsApp वर चॅटिंग; नवं फिचर लवकरच येणार

WhatsApp Features mobile number hide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन WhatsApp Features । Whatsapp हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आजकाल अँड्रॉइड मोबाईल आहे पण व्हाट्सअप वर अकाउंट नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. व्हाट्सअप मुळे आपली अनेक कामे सोप्पी झाली आहेत. दुसरीकडे कंपनी सुद्धा यूजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स व्हाट्सअप मध्ये ऍड करत असते. यापूर्वी व्हाट्सअपने डिसपायरिंग मेसेजेस, चॅट लॉक सारखे फीचर्स ऍड करून यूजर्सची प्रायव्हसी सेफ केली होती. आता वापरकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी व्हाट्सअपने सर्वात मोठा धमाका केला आहे. मोबाईल नंबर लपवून चॅटिंग कस येऊ शकते यावर सध्या कंपनी काम करत आहे. लवकरच हे फीचर्स यूजर्सना वापरता येणार आहे.

कस काम करेल नवीन फिचर – WhatsApp Features

आत्तापर्यंत तुम्ही लास्ट सीन हाईड केला असेल, व्हाट्सअप स्टेटस प्रायव्हसी हाईड केली असेल किंवा तुमचा डीपी म्हणजे डिस्प्ले पिक्चर लपवला असेल, परंतु आता तुम्ही लवकरच मोबाईल नंबर लपवून समोरच्या व्यक्तीसोबत चॅटिंग करू शकणार आहात. अलिकडच्याच एका अहवालानुसार, व्हॉट्सअॅप एका प्रायव्हसी अपडेटवर (WhatsApp Features) काम करत आहे ज्याद्वारे प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना यूजरनेम तयार करून त्यांचा मोबाइल नंबर लपवण्याची सुविधा मिळेल. म्हणजेच काय तर स्वतःचा मोबाईल नंबर लपवून समोरच्या व्यक्तीशी तुम्हाला बोलता येणार आहे. सध्या हे फिचर रोल आऊट झालं नसलं तरी लवकरच ते लाँच होण्याची शक्यता आहे . तुम्ही टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवर यूजरनेम सेट केल्याप्रमाणे एक वेगळे हँडल तयार करू शकाल, हे हँडल तयार करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. जसे की,

तुमच्या युजरनेम मध्ये किमान एक अक्षर असणे आवश्यक आहे.

तुम्ही लोअरकेस अक्षरे (a–z), संख्या (0–9), ठिपके (.) आणि अंडरस्कोअर (_) वापरू शकता.

वापरकर्तानावाची लांबी 3-30 वर्णांच्या दरम्यान असावी.

.com सारखे डोमेन त्यात ऍड केले जाऊ शकत नाहीत.

डॉट ने सुरू किंवा एन्ड होऊ शकत नाही आणि सलग दोन डॉट सुद्धा चालणार नाहीत.

आधीच घेतलेले यूजरनेम पुन्हा वापरले जाणार नाहीत.

जर तुमच्या संपर्क यादीमध्ये आधीच हँडल असेल तर ते देखील ब्लॉक केले जाईल.

एकदा तुम्ही योग्य यूजरनेम निवडल्यानंतर, WhatsApp तुम्हाला कन्फर्मेशन देईल मग नवीन हँडल तुमच्या खात्याशी लिंक होईल.