आता इंटरनेटशिवाय WhatsApp वरून फाईल शेअर करता येणार

WHATSAPP FILE TRANSFER
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प असल्यानेप्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप पाहायला मिळतेच. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत नवनवीन फीचर्स ऍड करत असते. त्यामुळे व्हाट्सअप वापरणं आणखी मजेशीर होत आहे. आताही व्हाट्सअप एक नवीन फीचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फिचर मुळे तुम्हाला इंटरनेटशिवाय WhatsApp वरून फाईल शेअर करता येणार आहे.

खरं तर अनेकदा आपण एकमेकांना फाईली शेअर करत असतो, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अँप सुद्धा उपलब्ध आहेत. त्याशिवाय व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा एकमेकांना फाईल्स शेअर करता येतात, मात्र त्यासाठी मोबाईल मध्ये इंटरनेट कनेक्शन असंण गरजेचं असत. मात्र आता तुम्ही इंटरनेटशिवायही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फाइल शेअर करू शकणार आहात. व्हाट्सअप एका नवीन फीचरवर काम करत आहे. या अंतर्गत व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना एकमेकांमध्ये फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फीचर इंटरनेटशिवाय दोन व्हॉट्सॲप अकाउंट्समध्ये फाइल्स ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. इंटरनेट शिवाय फाइल्स शेअर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये काही सेटिंग्ज चेंज कराव्या लागतील. त्यानंतर फाइल सहज शेअर करता येईल. WABetaInfo नुसार, हे फीचर व्हॉट्सॲप अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.24.9.22 यूजर्ससाठी उपलब्ध असेल. येथून इंटरनेट कनेक्शनशिवाय फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे किंवा इतर फाइल्स शेअर करणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी व्हॉट्सॲप सेटिंग मध्ये जाऊन परमिशन द्यावी लागेल.