Whatsapp देतंय 10 लाखांचं कर्ज; अशा पद्धतीने घ्या लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Whatsapp चा आत्तापर्यंतचा वापर तुम्ही चॅटींग, पेमेंट, कॉलिंग यासाठी केला असेल तर तुम्हाला माहित आहे का कि Whatsapp १० लाख रुपयांचे कर्ज सुद्धा देतेय. होय, ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. इंडिया इन्फोलाइन लिमिटेड (IIFL) फायनान्स ही कंपनी WhatsApp च्या माध्यमातून ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. हे एक बिझनेस लोन असेल आणि कोणत्याही त्याचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कष्ट पडणार नाहीत.

IIFL फायनान्सचे व्हॉट्सअॅपवरील बिझिनेस लोन हा एमएसएमई लोन व्यावसायातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे, जिथे कर्जाच्या अर्जापासून ते मनी ट्रान्सफरपर्यंत 100% कर्ज डिजिटल पद्धतीने केले जाते. भारतातील व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात WhatsApp चे 450 दशलक्षाहून अधिक यूजर्स आहेत. हे यूजर्स IIFL Finance कडून या 24×7 एंड-टू-एंड डिजिटल कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

WhatsApp च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला 9019702184 या क्रमांकावर HI मेसेज करावा लागेल. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जर तुम्ही दिलेली माहिती तुमच्या अर्जाशी जुळत असेल तर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल. मुख्य म्हणजे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असेल. सध्या IIFL फायनान्स त्यांच्या WhatsApp लोन चॅनेलद्वारे 1 लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) कर्जदारांच्या चौकशी हाताळण्यास सक्षम आहे.