हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp अनेक वेगवेगळे फीचर्स लॉन्च करत असते. याचाच एक भाग म्हणून आता व्हाट्सअपने मल्टिपल अकाऊंटचे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही एकाच फोनवरून दोन व्हाट्सअपचे अकाउंट चालवू शकता. यापूर्वी तुम्हाला व्हाट्सअपचे आणखीन एक अकाऊंट चालवण्यासाठी दुसरे बिजनेस व्हाट्सअप डाऊनलोड करावे लागत होते. मात्र आता व्हाट्सअपने आणलेल्या या नवीन विचार करून तुम्ही एकाच व्हाट्सअपवरून दोन अकाऊंटचालु शकता. या फीचर्स लाभ घेण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे.
दुसरे WhatsApp अकाऊंट कसे उघडायचे?
- सर्वात पहिल्यांदा तुमचे व्हाट्सअप अकाउंट ओपन करा.
- WhatsApp मध्ये तुम्हाला उजव्या स्क्रीन वरील तीन डॉटच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर खाली दिसत असलेल्या सेटिंग पर्यायावर क्लिक करा.
- यामध्ये अकाऊंटचा पर्याय दिसत असेल तो क्लिक करा.
- पुढील पर्यायावर Add Account दिसत असल्यास त्यावर क्लिक करा.
- पहिल्या क्रमांकावर तुम्हाला तुमचे व्हाट्सअप अकाउंट दिसेल तर दुसऱ्या क्रमांकावर साईनसह Add account दिसेल. यावरच क्लिक करा.
- पुढे Agree and Continue या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला कोणत्या नंबरवर व्हाट्सअप उघडायचे आहे तो क्रमांक तेथे टाका आणि नेक्स्ट क्लिक करा.
- आता तुम्हाला ओटीपी नंबर येईल तो ओटीपी नंबर नोंदवल्यास तुमचे दुसरे व्हाट्सअप अकाऊंट चालू होईल.