WhatsApp ने आणली 3 जबरदस्त फीचर्स; हॅकिंगला बसणार आळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वपूर्ण सोशल मीडिया अँप व्हाट्सअपने आपल्या यूजर्ससाठी ३ जबरदस्त फीचर्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. व्हाट्सअप वापरकर्त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित व्हावीत यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यानुसार अकाउंट संरक्षण(Account Protect), डिव्हाईस व्हेरीफीकेशन Device Verification, आणि ऑटोमॅटिक सुरक्षा कोड (Automatic Security Codes) अशी ३ सुरक्षा फीचर्स कंपनीने लाँच केली आहेत. यामुळे हॅकिंगला चांगलाच आळा बसणार आहे आणि व्हाट्सअप यूजर्सचे अकाउंट अधिक सुरक्षित राहणार आहे.

अकाउंट संरक्षण (Account Protect)-

तुम्हाला तुमचे WhatsApp खाते नवीन डिव्हाइसवर स्विच करायचे असल्यास अतिरिक्त सुरक्षा देत आहे. यापूर्वी फक्त OTP टाकायला लागत होता परतू आता त्यासोबत जुन्या डिव्हाइसेसवरील यूजर्सना त्यांचे अकाउंट दुसर्‍या डिव्हाइसवर चालू करू इच्छिता का? अशी सूचना करेल आणि तुम्हाला सतर्क करेल.

डिव्हाईस व्हेरीफीकेशन Device Verification-

व्हाट्सअप यूजर्सचे मोबाइल डिव्हाइस मालवेअरपासून संरक्षण करणे हेच या फीचर्सचे मुख्य काम आहे. यूजर्सचा मोबाईल हॅक झाल्यास डिव्हाईस व्हेरीफीकेशनचा तुम्हाला फायदा होईल. हे फीचर्स तुमचे अकाउंट ऑथंटिकेट करते आणि त्याच्या मदतीने अनधिकृत अॅप्स किंवा व्हॉट्सअॅप क्लोन अॅप्स स्कॅन करते. म्हणजेच, जर एखाद्या हॅकरला स्पायवेअर किंवा मालवेअरच्या मदतीने तुमच्या अकाउंटवरून अवांछित मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला तरी तो करू शकणार नाही. त्यामुळे तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित राहणार आहे.

ऑटोमॅटिक सुरक्षा कोड (Automatic Security Codes)-

व्हॉट्सअॅप टू-स्टेप व्हेरिफिकेशन आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप देखील सुरक्षा पर्याय म्हणून देत आहे. यूजर्सना त्यांचे मेसेज चॅट अधिक गोपनीय ठेवणे त्याचे उद्दिष्ट आहे. ज्याद्वारे हे कन्फर्म केलं जाईल की यूजर्स त्यांना हव्या असलेल्या संपर्कांशी चॅट करत आहेत आणि इतर कोणालाही संदेश पाठवत नाहीत. आतापर्यंत हे स्वहस्ते करणे शक्य होते परंतु आता ते ऑटोमेटेड पद्धतीने करता येणार आहे. हा कोड यूजर्सच्या प्रोफाइलवर गेल्यानंतर दिसेल आणि यूजर्स पारदर्शकतेसह कोड व्हेरिफाय करतील. तसेच चॅटिंग दरम्यान ते ठरवू शकतील की त्यांचे मेसेज इतर कोणीही वाचू शकत नाहीत