Whatsapp Multiple Account Feature : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प असलेल्या व्हाट्सअप वरून आपली अनेक कामे होतात. आजकाल युवकांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच जण व्हाट्सअपचा वापर करतात. कंपनी सुद्धा यूजर्सना आणखी चांगला अनुभव यावा यासाठी सतत व्हाट्सअपमध्ये नवनवन फीचर्स ऍड करत असते. आताही असच एक नवीन फीचर्स लाँच झालं असून यामुळे तुम्ही एकाच WhatsApp वर २ अकाउंट चालवू शकता.
व्हाट्सएप मल्टीपल अकाउंट फीचर (Whatsapp Multiple Account Feature) असे या नव्या फीचर्सचे नाव आहे. हे फीचर सध्या फक्त अँड्रॉइड यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं असून iOS वापरकर्त्यांसाठी लवकरच ते जारी करण्यात येईल. या फीचर्सचा वापर करण्यासाठी तुमचा मोबाईल ड्युअल सिमला सपोर्ट करणारा असावा तसेच मोबाईल मध्ये २ सिमकार्ड असणेही आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फीचर्सची चर्चा सुरु होती, टेस्टिंगही सुरु होते. मात्र अखेर हे फीचर्स यूजर्ससाठी हळू हळू रोलआऊट करण्यात येत आहे.
अशा प्रकारे सेट करा ड्युअल अकाउंट फिचर – Whatsapp Multiple Account Feature
सर्वात आधी व्हॉट्सॲपच्या ‘सेटिंग्ज’मध्ये जाऊन ‘Account ‘ विभागात जा.
त्याठिकाणी तुम्हाला ‘Add Account’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुमच्या प्रोफाइल बद्दल माहिती सेट करा.
यानंतर तुम्हाला तुमच्या फोन नंबरचे व्हेरिफिकेशन करण्यात येईल.
तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे OTP कोड येईल. तो कोड टाकल्यानंतर तुमचे दुसरे व्हॉट्सॲप अकाउंट सेट केले जाईल.
तुमचे अकाउंट स्विच करण्यासाठी, प्रोफाइल पिक्चरच्या डाव्या कोपऱ्यात डाउन ॲरो बटण दिसेल.
यानंतर तुम्ही दोन्ही अकाउंट स्विच करू शकता. आणि दोन्ही वापरू शकता.
समजा, वरील सर्व प्रोसेस करूनही जर जर तुमच्या मोबाईल मध्ये दोन व्हॉट्सॲप वापरण्याचा पर्याय दिसत नसेल, तर आणखी काही दिवस तुम्ही वाट बघू शकता. कारण कंपनी हळू हळू सर्व यूजर्स साठी हे फीचर्स रोलआऊट करत आहे. त्यामुळे काही काळ प्रतीक्षा करा.