Whatsapp New Feature | प्रत्येक स्मार्टफोन वापरणारा माणूस हा व्हॉट्सअँप वापरत असतो. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आता संदेशवहन करणे खूप सोपे आणि सुलभ झाले आहे. व्हॉट्सअँप द्वारे आपल्याला मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉईस कॉल यांसारख्या फीचर्सचा फायदा घेता येतो. व्हॉट्सअँप देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन अपडेट आणत असतात. अशातच आता एक नवीन फीचर आले आहे. यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट फीचर मिळणार आहे. त्यामुळे तुमचा पूर्ण न झालेला मेसेज आता तुम्हाला नंतरही पूर्ण करता येणार आहे. तुम्ही जर एका वेळी अनेक ठिकाणी चॅटिंग करत असाल, तर या फीचरचा तुम्हाला फायदा होणार आहे.
ड्राफ्ट्स वैशिष्ट्य कसे काम करते? | Whatsapp New Feature
या मध्ये व्हॉट्सअँपच्या मेन चॅट लिस्टमध्ये तुम्हाला अपूर्ण मेसेजसाठी एक हिरवा ड्राफ्ट लेबल दिसेल. तसेच ड्राफ्ट चॅट मध्ये वरचा बाजूला देखील याची माहिती मिळेल. तुमचे जे मेसेज अर्धवट राहिले आहेत. त्याची तुम्हाला लगेच माहिती समजेल. आणि तुम्हाला पुन्हा तो मेसेज लिहिण्यासाठी वेळ मिळेल.
ग्लोबल अपडेट लवकरच उपलब्ध होणार
व्हॉट्सअँपच्या या फीचरचा फायदा आता संपूर्ण जागतिक स्तरबत होणार आहे. मेटाचे प्रमुख मारक झुकेरबर्ग यांनी त्यांच्या व्हॉट्सअँप चॅनलवर याबाबत माहिती दिलेली आहे. यामुळे आता तुमच्या चॅटिंग करण्याचा अनुभव अधिक सुलभ होणार आहे. अस विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
व्यवसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ड्राफ्ट लेबल वरच्या क्रमांकावर ठेवले जाणारे मेसेज यामुळे संपर्क साधने सोप्पे होणार आहे. व्हाट्सअपच्या नवीन फीचरमुळे आता युजरला चांगल्या प्रकारे व्हाट्सअपचा वापर करता येणार आहे. तसेच संदेशवहन देखील सोपे होणार आहे. डिजिटल संवाद साधने अधिक सुलभ होणार आहे.