WhatsApp वर फोटो-व्हिडिओसाठी आलं नवं फीचर्स; चॅटिंगची मजा होणार दुप्पट

whatsapp feature (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे सध्याच्या घडीला देशातील नंबर एकचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. वापरायला अतिशय सोप्प असल्याने जवळपास प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप पाहायला मिळते. आपल्या यूजर्सना अधिक चांगला अनुभव मिळाला यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स अपडेट करत असते. आताही व्हाट्सअप नव्या एका फीचर्सवर काम करत असून एकदा का हे फिचर लाँच झालं कि मग तुम्ही फोटो आणि विडिओवर एका क्षणात प्रतिक्रिया देऊ शकता.

सध्या, इमेज किंवा व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यावर लांब टॅप करावा लागतो आणि दिसत असलेल्या बारमधून तुमची प्रतिक्रिया दयावी लागते. परंतु, व्हॉट्सॲप एका नवीन फीचरचे टेस्टिंग करत आहे ज्यामुळे सदर फोटो आणि विडिओ वर जास्त टॅप करावा लागणार नाही. WABetaInfo ने या संदर्भात एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये हे आगामी फीचर कसे वर्क करेल ते तुम्ही पाहू शकता . फोटो पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲपवर फोटो किंवा व्हिडिओ उघडता तेव्हा तुम्हाला तळाशी एक वेगळा बार दिसेल, जिथे तुम्ही त्या मीडियाबद्दल कमेंट्स करू शकता. बारच्या बाजूला एक प्रतिक्रिया बटण आहे, त्यावर टॅप केल्यावर वेगवेगळ्या इमोजी तुम्हाला दिसतील.

दरम्यान, WABetaInfo ने सांगितले की सध्या हे फीचर काही निवडक यूजर्स साठी देण्यात आले आहे आणि लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध केले जाईल. अलीकडे व्हॉट्सॲपवर अनेक खास फीचर्स सादर करण्यात आले आहेत. डेव्हलपर्स सतत व्हाट्सअप मध्ये नवनवीन अपडेट्स आणून यूजर्सना खुश करत असतात . व्हाट्सअप फिल्टर चॅटचा पर्याय सुद्धा ग्राहकांना देणार आहे तसेच तुमच्या आवडत्या व्यक्तींना फेव्हरेट चॅटच्या माध्यमातून टॉपला ठेऊ शकता.