Whatsapp चे नवीन फीचर्स!! Video Call कॉलसाठी लँडस्केप मोड, चॅट ट्रान्सफर अन बरंच काही; पहा संपूर्ण लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावरील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म म्हणून आपण Whatsapp कडे बघत असतो. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात व्हाट्सअपचे यूजर्स मोठ्या प्रमाणात आहे. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांशी चॅटिंग, फोटो आणि व्हिडिओ सेंड करणे, लोकेशन सेंड, यांसारख्या अनेक गोष्टीचा वापर करू शकतो. यूजर्सना Whatsapp वापरणे अधिक सोप्प जावं यासाठी कंपनी नेहमीच वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असते. आताही Whatsapp असेच काही नवीन फीचर्स लाँच करत आहे, ज्यामुळे आता व्हाट्सअप वापरणं अजून मजेशीर होईल.

व्हिडिओ कॉलसाठी लँडस्केप मोड-

Whatsapp आता iOS वापरकर्त्यांसाठी आणत असलेल्या फीचर्स मध्ये व्हिडिओ कॉलसाठी लँडस्केप मोड सपोर्टचे एक महत्वाचे फीचर्स आहे. यामुळे विडिओ कॉल करताना मोबाईल लँडस्केप मोड मध्ये ठेवता येणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ संभाषणादरम्यान अजून छान वाटेल. गेल्या अनेक दिवसांपासून यूजर्स या फीचर्सची मागणी करत होते.

सायलेंट कॉल –

Whatsapp आता अनोळखी कॉल सायलेंट करणारे फीचर्स घेऊन येत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना इनकमिंग कॉलवर आणि विशेषत: अनोळखी कॉलरच्या कॉलवर अधिक नियंत्रण मिळेल. यूजर्स आता सेटिंग्ज – प्रायव्हसी – कॉल्सवर जाऊन अज्ञात नंबरवरून आलेले कॉल सायलेंट मोड वर ठेऊ शकतात. जे त्यांना अडथळा आणणारे व्यत्यय आणि स्पॅम कॉल्स टाळण्यास मदत करतील.

चॅट ट्रान्सफर

याव्यतिरिक्त, नवीन स्मार्टफोनवर स्विच करणार्‍या वापरकर्त्यांसाठी WhatsApp एक नवीन फीचर्स घेऊन येत आहे. यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल चेंज केला तरी तुमची संपूर्ण हिस्ट्री प्लॅटफॉर्मवरून हस्तांतरित करू शकतात, दुसर्‍या आयफोनवर स्विच करताना महत्त्वाचे चॅट आणि अन्य गोष्टी तुम्ही ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी सेटिंग मध्ये जाऊन चॅट्स – आयफोनवर चॅट्स ट्रान्सफर करा या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

पुन्हा डिझाइन केलेले स्टिकर ट्रे-

व्हाट्सअँप आपल्या यूजर्स साठी पुन्हा एकदा नवनवीन स्टिकर्स घेऊन येत आहे. आणि वापरकर्त्यांना अवतारांच्या संदर्भात अधिक पर्याय ऑफर करते जेणेकरून ते त्यांच्या भावना अधिक सहजपणे व्यक्त करू शकतील. परतू कंपनीने वापरकर्त्यांसाठी रोलआउटची अधिकृत टाइमलाइन जाहीर केलेली नाही आणि आगामी अपडेट सह नजीकच्या भविष्यात रोल आउट होईल अशी अपेक्षा आहे. सर्व वापरकर्त्यांनी whatsapp प्ले स्टोअरवरून अपडेट कारण असा सल्ला कंपनीने दिला आहे.