हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे करोडो यूजर्स आहेत. आपल्या वापरकर्त्यांना चांगला आणि नवनवीन अनुभव यावा म्हणून कंपनी सतत व्हाट्सअप यामध्ये अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. आताही व्हाट्सअप एका नव्या फीचरवर काम करत आहे ज्यामाध्यमातून मोबाईल मध्ये इंटरनेट नसले तरीही तुम्ही एकमेकांना फोटो, व्हिडिओ तसेच काही फाईल्स शेअर करू शकता. ‘People nearby’ असं या नव्या फिचरचे नाव आहे. एकदा का हे फिचर लाँच झालं कि मग फाईल शेरिंग साठी इंटरनेट ची आवश्यकता लागणार नाही.
WABetaInfo या व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये या फीचरची माहिती दिली आहे आणि हे फीचर आयफोन यूजर्ससाठी टेस्टफ्लाइट प्रोग्रामद्वारे “24.15.10.70” मध्ये विकसित केले जात असल्याचेही सांगितले आहे. रिपोर्टनुसार, आगामी ‘People nearby’ फीचर iOS वर ॲपच्या भविष्यातील अपडेटमध्ये उपलब्ध होऊ शकते. याआधी, कंपनी एप्रिल 2024 मध्ये Android वर या फीचरवर काम करताना दिसली होती. या फीचरच्या माध्यमातून जवळपासचे यूजर्स इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हाट्सअप वरून सहजपणे एकमेकाना फोटो, व्हिडिओ, किंवा अन्य डॉक्युमेंट यांसारख्या फायली पाठवू शकतात किंवा घेऊ शकतात.
वैशिष्ट्याच्या स्क्रीन ग्रॅबनुसार, iOS मेकेनिज्म इंटरनेट शिवाय फाइल शेअर करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे अनिवार्य करू शकते. ज्याठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून फाईल शेअर करणे शक्य नाही अशाठिकाणी हे फिचर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आजही देशातील अनेक ग्रामीण भागात इंटरनेट ची सुपर फास्ट सुविधा नाही अशावेळी तेथील यूजर्सना व्हाट्सअपच्या या नव्या फीचरमुळे आरामात एकमेकांना फाईल्स शेअर करू शकतात. तसेच ज्यांना इंटरनेट डेटा वाचवायचा आहे अशा वापरकर्त्यांना सुद्धा या नव्या व्हाट्सअप फीचरचा फायद होणार आहे. ‘People nearby’ फिचर Android पासून iOS पर्यंत सर्व प्लॅटफॉर्मवरला सपोर्ट करेल. सध्या हे फिचर सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हे फिचर कधी यूजर्ससाठी उपलब्ध होईल याबाबत WABetaInfo ने कोणतीही माहिती दिलेली नाही.