Whatsapp Scam | तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. त्यातही सोशल मीडिया आजकाल तंत्रज्ञानाचा एक मूलभूत पाया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याला घरबसल्या अनेक गोष्टी समजतात. या सोशल मीडियामुळे संपूर्ण जग एकमेकांशी जोडले गेलेले आहे. परंतु तंत्रज्ञानाने केलेल्या या प्रगतीचा माणसांना जेवढा फायदा होतो, तेवढाच त्याचा तोटा देखील झालेला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सायबर क्राईमचे धोके देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी whatsapp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि अशाच आता व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक स्कॅमर्स हे व्हाट्सअपच्या माध्यमातून वेडिंग इन्व्हाईट म्हणजे डिजिटल वेडिंग कार्ड लोकांना पाठवत आहेत. आणि त्या माध्यमातून पैसे लुटत आहेत. हे लोक आपली वैयक्तिक माहिती देखील चोरण्याचे काम करतात. त्यामुळे आता सायबर क्राईम डिपार्टमेंटने देखील लोकांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून व्हाट्सअप वर डिजिटल वेडिंग कार्ड खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक लोक दूर राहिल्याने त्याच्या नातेवाईकांना घरी जाऊन लग्नाची पत्रिका देता येत नाही. त्यामुळे ते व्हाट्सअपच्या माध्यमातून हे वेडिंग कार्ड पाठवतात. परंतु आता स्कॅमर्स साठी पैसे लुटण्याचा एक नवीन साधन झालेले आहे. नवीन पत्र देण्याच्या माध्यमातून स्कॅमर्सने एक वेडिंग इन्व्हाईट तयार केलेले आहे. स्कॅमर्स व्हाट्सअपवर वेडिंग इन्व्हाईटमध्ये एक APK फाईल पाठवतात.
त्यानंतर तुम्ही या इन्व्हाईट लिंकवर क्लिक केले की, तुमच्या फोनमध्ये एक मालवेअर डाऊनलोड होता. आणि त्यामुळे त्याच्या मदतीने तुमच्या माहितीचा एक्सेस घेतात. आणि तुमची वैयक्तिक माहिती मिळून ऑनलाईन फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जर तुम्हाला अशा कोणत्याही फाईल आल्या, तर त्यावर अजिबात क्लिक करू नका.
सायबर क्राईम डिपार्टमेंटने देखील लोकांना यांसारख्या स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन केलेले आहे. जर तुमच्यापैकी कोणासोबत असा स्कॅम झाला, तर त्यांनी नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून तक्रार करू शकता. परंतु अशा प्रकारची कोणतीही फाईल जर तुमच्या whatsapp वर आली तर त्यापासून सावध रहा.