WhatsApp Secret Code Feature : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. सुरुवातीला फक्त मेसेज आणि फोटो विडिओ आपण व्हाटसप वरून शेअर करत होतो, मात्र बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार व्हाट्सअप सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आता आपण व्हाट्सअप वरून आपली पर्संनल तशीच ऑफिशिअल कामे करू शकतो तसेच पैसेही पाठवू शकतो. एकीकडे नवनवीन फीचर्स ऍड करत असताना व्हाट्सअप आपल्या यूजर्सच्या सुरक्षिततेकडे सुद्धा लक्ष्य देत असत. आताही व्हाट्सअप असं एक नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे कि ज्यामुळे तुमचं चॅटिंग दुसरी कोणती व्यक्ती वाचू शकणार नाही. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….
WhatsApp विचारणार सीक्रेट कोड – WhatsApp Secret Code Feature
मेटा कंपनी आता सीक्रेट कोड नावाचे फीचर आणण्याची तयारी करत आहे. कंपनी हे फीचर व्हॉट्सॲप वेबसाठी आणणार आहे, जेणेकरून चॅटची सुरक्षा आणि गोपनीयता सुधारता येईल. WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरबद्दल माहिती दिली. सध्या ते फीचर्स डेव्हलप केलं जात आहे. व्हॉट्सॲपचे हे फीचर वेब व्हर्जनसाठी खूप महत्त्वाचे आहे. कंपनीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की लॉक केलेल्या चॅटची यादी उघडण्यासाठी WhatsApp एक गुप्त कोड विचारत आहे.
WhatsApp is working on a secret code feature to secure locked chats for the web client!
— WABetaInfo (@WABetaInfo) February 19, 2024
WhatsApp is developing a secret code feature to protect locked chats for the web client, providing an added layer of security and privacy for conversations.https://t.co/BUuSE2OclO pic.twitter.com/kS482NbJ7Y
वेबवर लॉक केलेलं चॅट्स उघडण्यासाठी, यूजर्सने त्याच्या मोबाइल डिव्हाइसमध्ये सेट केलेला सीक्रेट कोड आवश्यक असेल. या फिचरमुळे (WhatsApp Secret Code Feature) व्हाट्सअप वेब वापरणाऱ्या वापरकर्त्यांची सुरक्षा आणि मजबूत होईल. ज्या लोकांच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा ऍक्सेस अन्य लोकांकडे सुद्धा आहे अशा लोकांना हे फीचर्स जास्त उपयोगी पडू शकते. कारण लॉक्ड चॅट आणि सिक्रेट कोड फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचं चॅटिंग सेफ ठेऊ शकता, आणि दुसरं कोणीही ते वाचू शकणार नाही. सध्या कंपनी या फीचर्सवर काम करत असून लवकरच ते ग्राहकांना वापरता येईल.