WhatsApp Status । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअपचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प आणि सर्व फीचर्सने सुसज्ज असलेल व्हाटसप अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा किती तरी पटीने लोकप्रिय आहे. व्हाट्सअप वापरताना आपल्या यूजर्सना जास्तीत जास्त चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आताही कंपनी अशा एका फिचरवर काम करत आहे ज्यामुळे तुम्ही व्हाट्सअप स्टेटस वर १ मिनिटापर्यंत विडिओ अपलोड करू शकता.
युजर्सची चिंता मिटली – WhatsApp Status
खरं तर व्हाट्सअप स्टेट्स वर विडिओ अपलोड करण्याची सुविधा यापूर्वी देण्यात आली आहे. परंतु आत्तापर्यंत आपण एका वेळी फक्त ३० सेकंदाचा विडिओच स्टेटस वर ठेऊ शकत होतो. एखादा मोठा विडिओ व्हाट्सअप स्टेट्स वर ठेवायचं झाल्यास, आपल्याला तो कट करून ठेवावा लागत होता. मात्र आता हाच वेळ ३० सेकंदापासून १ मिनिटापर्यंत वाढवण्यात येणार आहे. म्हणजेच यूजर्स आता १ मिनिट पर्यंतचा विडिओ व्हाट्सअप स्टेटस वर ठेऊ शकतात. व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरची बीटा टेस्टिंगही सुरू झाली असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी सुद्धा व्हाट्सअप ने स्टेट्स (WhatsApp Status)संदर्भात नवीन फीचर्स आणलं होत. कॉन्टॅक्ट मेन्शन असे या फिचरचे नाव असून तुम्ही ज्या व्यक्तीसाठी स्टेट्स ठेवला आहे, त्याला तो बघावाच लागेल. कधी कधी काहीजण विशिष्ट व्यक्तींसाठी स्टेट्स ठेवतात. मग त्या व्यक्तीने आपला स्टेट्स बघितला आहे कि नाही हे आपण सतत चेक करत राहतो… अनेकदा तर आपण टाकलेला स्टेटस (WhatsApp Status) समोरची व्यक्ति बघत पण नाही, त्यामुळे आपली मोठी निराशा होते. मात्र कॉन्टॅक्ट मेन्शन फीचरच्या मदतीने तुम्ही ज्या व्हॉट्सॲप युजरचा तुमच्या स्टेटसमध्ये उल्लेख कराल त्याला तुमच्या स्टेटसची सूचना दिली जाईल. आणि त्या व्यक्तीला तुमच्या स्टेट्स बद्दल माहिती समजेल