Whatsapp | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातही व्हाट्सअपचा वापर हा प्रत्येकजण करत असतो व्हाट्सअप हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचाही भाग झालेला आहे. आपण व्हाट्सअप वरून एखाद्याला मेसेज करू शकतो, वाईस कॉल करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला एखादा फोटो व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट शेअर करायचे असेल, तरी आपण व्हाट्सअपच्या मदतीने ते पाठवू शकतो. व्हाट्सअपची (Whatsapp) मूळ कंपनी मेटा आहे. आणि मेटा त्यांच्या युजरसाठी वेळोवेळी प्रायव्हसी बाबत नवीन फीचर्स आणत असते.
अनेकवेळा व्हाट्सअप (Whatsapp) वापरताना आपल्याला असे वाटते की, आपले मेसेज कोणीतरी पाहत आहेत किंवा ऐकत आहेत. आता तुम्हाला जर अशी शंका आली तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचा मेसेज कोण पाहत आहेत. हे पाहू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत.
समजा जर तुमच्या मोबाईलवर व्हाट्सअपचा नोटिफिकेशनचा आवाज आला पण व्हाट्सअपमध्ये जर तुम्हाला काही दिसले नाही, तर याचा अर्थ तुम्ही चॅटिंग कोणीतरी पहात आहे, हे समजून घेतले पाहिजे. जर तुमच्या मोबाईलवर असे काही नोटिफिकेशन येत असतील. त्याबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती नसेल, तर या गोष्टींपासून देखील तुम्ही सतर्क रहाणे खूप गरजेचे आहे. कारण तुमच्या सूचना मेसेज पाहणाऱ्या ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला असे वाटले की, तुमचे व्हाट्सअपची चॅटिंग कोणी पाहत आहेत तर तुम्ही सगळ्यात आधी व्हाट्सअप सेटिंगमध्ये जाऊन वेब वर्जनवर क्लिक करून सगळे लॉग आऊट केले पाहिजे. त्यानंतर तुमचे व्हाट्सअपचे डिटेल्स कोणालाही समजणार नाही.
त्याचप्रमाणे अनेक लोक थर्ड पार्टी व्हाट्सअप इन्स्टॉल करतात. जे पूर्णपणे असुरक्षित असतात.यासाठी मेटा कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. जर तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड केले आणि त्यावरून जर व्हाट्सअप वापरत असाल, तर तुमचे वॉट्सअप हॅक होण्याची शक्यता जास्त असते. आणि ती पूर्णपणे तुमची जबाबदारी असते. त्यामुळे स्मार्टफोन युजर्सनी नेहमी अधिकृत whatsapp चा ॲप इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.