Whatsapp Update | व्हाट्सअँप आणणार नवीन अपडेट; दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर ऍक्सेस करता येणार कॉन्टॅक्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Whatsapp Update । जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अँपमध्ये व्हाट्सअँपला (Whatsapp Update) पाहिले जाते. अगदी कुटुंबापासून ते ऑफिसपर्यंत सर्व क्षेत्रात या प्लँटफॉर्मचा वापर केला जातो. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म आपलया ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतात. आता ते युजर्ससाठी कॉन्टॅक्ट मॅनेजरची सुविधा घेऊन येत आहेत. यामुळे तुमचा चॅटिंगचा अनुभव आणखीन सुधारणार आहे. या फीचर्समुळे तुम्हाला फोनची गरज भासणार नाही . तर चला पाहुयात या नव्या फीचर्स बदल माहिती .

कॉन्टॅक्ट्स मॅनेज | Whatsapp Update

या नव्या फीचरसोबत युसर्सना कोणत्याही डिव्हाइसवरून कॉन्टॅक्ट्स मॅनेज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोबाईलची गरज लागणार नाही . सुरुवातील हे नवीन फिचर व्हाट्सअँप वेब आणि विंडोज प्लॅटफॉर्मसाठी आणले जाणार आहे. WABetaInfo या व्हाट्सअँपच्या फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइटने या फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तसेच यामध्ये तुम्ही डेकॅस्टाप आणि इतर लिंक केलेल्या डिव्हाईसवर नंबर सेव्ह करू शकता.

व्हाट्सअँपवर सेव्ह नंबर्स

याआधी बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट्स बाबत समस्या येत होत्या, कारण व्हाट्सअँप हे फोन बुकमधील कॉन्टॅक्ट्सवर अवलंबून होते. तसेच फोनमधील नंबर डिलीट केल्यानंतर व्हाट्सअँपवरून नाव डिलीट व्हायचे. पण आता युसर्सने व्हाट्सअँपवर सेव्ह केलेले नंबर्स दुसऱ्या डिव्हाईसवर ऑटोमॅटिकली मिळवू शकतील. हे दमदार फीचर्स लवकरच ग्राहकांच्या सेवेत येणार असून, ज्यामुळे युसर्सना व्हाट्सअँपचा वापर आणखीन सोपा आणि सुलभ होणार आहे. या फीचरचा लोकांना खूप जास्त फायदा होणार आहे. यामुळे मोबाईलचा वापर देखील कमी होणार आहे.