WhatsApp Update| फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात व्हाट्सअप लोकप्रिय आहे. या व्हाट्सअपमध्ये (WhatsApp App) युजर्सच्या सोयीसाठी अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात येतात. तसेच आवश्यकतेनुसार काही बदलही केले जातात. खास म्हणजे, असाच एक मोठा बदल पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपमध्ये होणार आहे. हा बदल व्हाट्सअपच्या डिझाईनशी संबंधित असेल.(WhatsApp Update) हे बदल झाल्यानंतर युजर्सला एका नव्या रूपात व्हाट्सअप पाहिला आहे. हे नवे व्हाट्सअप वापरण्यासाठी ही अधिक सुलभ असेल.
व्हाट्सअपमध्ये होणार हे बदल (WhatsApp Update)
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सअपने आपल्या डिझाईनमध्ये एक मोठा बदल करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आपल्याला व्हाट्सअप डार्क मोडमध्येही पाहायला मिळू शकते. हे बदल अँड्रॉइड आणि अॅपल अशा दोन्ही युजर्ससाठी करण्यात आले आहेत. या नव्या बदलामुळे व्हाट्सअप ॲप एका नव्या रंगांमध्ये आणि नव्या रुपात दिसेल. ज्यामुळे व्हाट्सअपची आकर्षकता आणखीन वाढेल. नव्या बदलानंतर व्हाट्सअप ॲपमध्ये आणखीन काही फीचर्स पाहिला मिळतील.
कंपनीने सांगितले आहे, व्हाट्सअपच्या नव्या डिझाईन साडी व्हाट्सअपवर 35 हून अधिक रंगांचे प्रयोग करण्यात आले आहेत. परंतु यात डार्क मोड पर्याय निवडण्यात आला आहे. यामुळे कमी प्रकाशात युजरला व्हाट्सअप वापरता येईल. यापूर्वीही व्हाट्सअपमध्ये डार्क मोड हा पर्याय होता, परंतु नवीन रूपात देण्यात आलेला डार्क मोड अधिक उत्तम असणार आहे. ज्याला युजर्सकडून चांगली पसंती मिळेल.
नविन फीचर मिळणार (WhatsApp Update)
व्हाट्सअपच्या या नव्या अपडेटमध्ये नवीन नेव्हिगेशन दिले जाईल. या बारच्या मदतीने युजर्स महत्त्वाच्या सेक्शनपर्यंत सहज पोहोचू शकतील. यात त्यात चॅट्स, कॉल्स, कम्युनिटीज आणि अपडेट्स याचा समावेश असेल. व्हाट्सअपच्या नव्या व्हर्जनमध्ये आयफोन युजर्ससाठी एक खास बदल करण्यात आला आहे. आता आयफोन युजर्स ला व्हिडिओ किंवा एखादी फाईल पाठवत असताना पूर्ण स्क्रीन भरणारा मेनू दिसणार नाही. त्या जागी त्यांना एक छोटा बॉक्स दिसेल. तो उघडल्यानंतर त्यात फोटो डॉक्युमेंट असे पर्याय असतील.
दरम्यान, व्हाट्सअप आपल्या बॅकग्राऊंडमध्ये देखील बदल करणार आहे. परंतु हे बदल युजर्सला कधी दिसतील याची तारीख अजून समोर आलेले नाही.(WhatsApp Update) पुढील काही आठवड्यांमध्ये व्हाट्सअपचे अपडेटेड व्हर्जन पाहायला मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.