WhatsApp Video Calling : WhatsApp वरून एकाच वेळी 32 जणांना Video Call करता येणार

WhatsApp Video Calling 32 people
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगभरात करोडो यूजर्स व्हाटसअप चा वापर करत असतात. आपल्याला भारतात सुद्धा जवळपास सर्वानाच व्हाट्सअपचे वेड आहे. कंपनी सुद्धा यूजर्सना वेगवेगळा अनुभव मिळावा म्हणून व्हाट्सअप मध्ये सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. आताही व्हाट्सअपने असेच एक फिचर आणलं आहे त्यामाध्यमातून तुम्ही एकाच वेळी तब्बल ३२ लोकांना विडिओ कॉल (WhatsApp Video Calling) करू शकता. .

तुम्ही डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्हीवर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल (WhatsApp Video Calling) वापरू शकता. या फीचरचा फायदा असा होईल की आता तुम्हाला व्हिडिओ कॉलसाठी झूम, गुगल मीट सारख्या ॲप्सवर जाण्याची गरज नाही. हे फीचर्स वापरकर्त्याच्या डेस्कटॉपवर देखील काम करेल आणि व्हर्च्युअल मीटिंग आणि ऑनलाइन क्लासेस साठी सुद्धा त्याचा वापर होईल. व्हाट्सअपच्या या नव्या फीचर्समध्ये ऑडिओसह स्क्रीन शेअरिंग, स्पीकर स्पॉटलाइटचा समावेश आहे. येत्या काही आठवड्यात ते सर्व युजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.

ऑडिओसह स्क्रीन शेअरिंग– WhatsApp Video Calling

व्हिडिओ कॉलच नव्हे तर व्हॉट्सॲपमध्ये ऑडिओ फीचर्ससह स्क्रीन शेअरिंगची सुविधा जोडण्यात आली आहे. त्याच्या मदतीने, यूजर्स कॉल सुरु असताना एकमेकांना स्क्रीन आणि ऑडिओ शेअर करू शकतात. कॉल दरम्यान ऑन-स्क्रीन कंटेंट दाखवण्यासाठी हे फीचर्स उपयुक्त ठरेल. अगदी Google Meet किंवा Zoom Call असणारे हे फीचर्स पर्सनल आणि बिझनेस अशा दोन्ही अकाउंट साठी चालेल. हे फीचर्स झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सला टक्कर देईल हे नक्की.