Whatsapp Voice Chat Feature : Whatsapp चा धमाका!! टायपिंग शिवाय करा Live चॅटिंग, नवं फीचर्स लाँच

Whatsapp Voice Chat Feature
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Whatsapp Voice Chat Feature। जगातील आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं Whatsapp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन गोष्टी आणत असते. नेहमी कोणते ना कोणते नवीन फीचर्स लाँच करून यूजर्सचे काम आणखी सोप्प कस होईल याकडे व्हाट्सअपचा कल असतो. आताही कंपनीचे यूजर्सचे हित लक्ष्य घेऊन नवीन फिचर आणलं आहे. वास्तविक, आतापर्यंत, तुम्ही ग्रुप चॅटमध्ये टाइप करून किंवा थेट व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून चॅट करू शकत होता. आता व्हॉट्सअॅपने व्हॉइस कॉलप्रमाणेच व्हॉइस चॅट फीचर लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही कॉल न करता ग्रुपमध्ये लाईव्ह बोलू शकाल.

व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर (Whatsapp Voice Chat Feature) विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना ग्रुप मध्ये मोठमोठे मेसेज टाईप करण्याचा कंटाळा येतो. कारण आता तुम्ही तुम्ही ग्रुप चॅटमध्ये, हँड्सफ्री आणि रिअल-टाइममध्ये थेट तुमच्या स्वतःच्या आवाजात बोलू शकता. याचा अर्थ असा की कॉल न करता, थेट ग्रुपमध्ये थेट व्हॉइस चॅट सुरू करता येते जणू काही समोरासमोर संभाषण सुरू आहे. खरंतर, जर तुम्ही ग्रुपमध्ये व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल केला तर तो कॉल ग्रुपमधील सर्व सदस्यांना जातो. त्यामुळे तुम्ही ग्रुपमधील सर्व सदस्यांना त्रास न देता त्यांच्याशी बोलू शकत नाही. आता मात्र व्हॉइस चॅट फीचरच्या मदतीने तुम्ही कोणालाही डिस्टर्ब् न करता लाईव्ह चॅट करू शकता. तुमच्या ग्रुपमध्ये ३-४ लोक असोत किंवा १०० पेक्षा जास्त मेम्बर असो, आता सर्व यूजर्स या व्हॉइस चॅटचा लाभ घेऊ शकतात.

असा करा वापर- Whatsapp Voice Chat Feature

व्हाट्सअप व्हॉइस चॅट सुरू करण्यासाठी, तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये व्हॉइस चॅट सुरू करायचे आहे तिथे आधी जावे लागेल. यानंतर, तुम्ही चॅटला खालून वर स्वाइप करून व्हॉइस चॅट सुरू करू शकाल.
एकदा चॅट सुरू झाला की, ते त्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना चॅटच्या खालच्या बाजूला जॉईन बटणासह दिसेल.
या बटणावर टॅप करून, ग्रुपमधील कोणताही सदस्य व्हॉइस चॅटमध्ये सामील होऊ शकतो. त्याची सूचना कोणालाही मिळणार नाही. परंतु ग्रुपमध्ये जो कोणी ऍक्टिव्ह असेल तो ते पाहू शकेल.
महत्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेजेसप्रमाणे, हे फीचर देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सिक्युर केले जाईल. हे फीचर सर्व अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल साठी आणले जात आहे. जर तुम्हालाही हे फीचर वापरायचे असेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करा.