हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून करोडो यूजर्स व्हाट्सअपचा वापरत करत असताना. वापरायला अतिशय सोप्प आणि सुलभ असल्याने सर्वजण आरामात व्हाट्सअपचा आनंद घेत असतात. एकमेकांना मेसेज करणे, फोटो विडिओ किंवा कोणतेही डॉक्युमेंट सेंड करणे आदी कारणासाठी व्हाट्सअप वापरलं जातं. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत अपडेटेड फीचर्स आणत असते आणि आपल्या यूजर्सना नवनवीन अनुभव देत असते. आताही व्हाट्सअप अशाच एका फीचरवर काम करत असून यामुळे तुम्हाला मेसेज टाईप करायची गरज लागणार नाही. Meta AI चाय माध्यमातून व्हॉइस मेसेजद्वारे तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकाल.
खरं तर व्हाट्सअपने आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI ) चॅटबॉट Meta AI व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरसाठी जारी केला आहे. मेटा एआय सध्या वापरकर्त्यांच्या टेक्स्ट मेसेजला रिप्लाय देते, परंतु आता नवीन अपडेटनुसार, ते व्हॉइस मेसेजला सुद्धा रिप्ल्या देईल. सध्या या नव्या फीचर्सचे टेस्टिंग सुरु असून येत्या आठवड्यात हे फिचर रोलआऊट होईल. व्हॉट्सॲपच्या फीचर्सचा मागोवा घेणारा ट्रॅकर WABetaInfo ने या नवीन फीचरबाबत माहिती दिली आहे.
अहवालात म्हटले आहे की व्हाट्सअपच्या या नवीन फीचरचे टेस्टिंग Android आवृत्ती 2.24.16.10 वर केली जात आहे जी बीटा प्रोग्रामचा भाग आहे. नवीन अपडेटनंतर, वापरकर्त्यांना मेटा एआयच्या बटणासह व्हॉईस मेसेजचा इंटरफेस दिसेल, ज्यावर क्लिक करून यूजर्स व्हॉईस मेसेज द्वारे मेटा एआयला प्रश्न विचारण्यास सक्षम असतील. या फीचरमुळे वापरकर्ते मेटा एआयला आवाजात संदेश (voice message) पाठवू शकतील. या व्हॉइस मेसेजचे विश्लेषण करून मेटा एआय त्यानुसार लिखित उत्तरे देईल आता तुम्हाला हव्या असणाऱ्या माहितीसाठी तुम्हाला चॅटबॉटवर टायपिंग करत बसण्याची गरज लागणार नाही.