WhatsApp आणत आहे नवीन फिचर; सुरक्षिततेसाठी आहे आवश्यक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp मेसेजिंग अॅप हे जगभरातील अब्जो लोक नेहमीच वापरतात. Whatsapp ने आता नवीन फीचर्स जाहीर केले आहेत. तसेच फोटो, व्हिडीओ, संदेश शेअर करण्यासाठी अनेकजण Whatsapp ला प्राधान्य देतात. मेटाने व्हाट्सअपची संदेश सुविधा आणि प्रायव्हसी वाढवण्याची दक्षता घेतली आहे. मेटा आता प्रायव्हसी चेकअप आणत आहे. व्हाट्सअप युजर्सना हे फीचर आवडेल आणि उपयोगी पडेल असे आहे. हे नवे फिचर कोणते त्याबद्दल समजावून घेऊ या.

हे फीचर युजर्सना व्हाट्सअप सेटिंग्जमधील सर्व प्रायव्हसी सेटिंग्ज सहजपणे पाहण्याची आणि मॅनेज करण्याची परवानगी देत आहे. आपली माहिती कोण पाहू शकेल असे सेटिंग युझार्स करू शकतील. व्हाट्सअपमधील हे फीचर वापरायचे असेल तर प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये ‘स्टार्ट प्रायव्हसी चेकअप’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही एका स्क्रीनवर जाल. या स्क्रीनवर तुमच्याशी कोण संपर्क साधू शकेल हे तुम्ही पाहू शकाल. तसेच तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपवर कोण जोडू शकतो आणि तुम्ही ब्लॉक केलेल्यापैकी कोणते संपर्क पुन्हा जोडायचे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकणार आहेत. डिसएपियरिंग मेसेज सेटअप करून आणि एंड-टू-एंड एनक्रिप्टेड बॅकअप इनेबल करून तुम्हाला तुमच्या चॅट आणि ग्रुपमध्ये प्रायव्हसी सिस्टम जोडू शकाल.

अनोळखी कॉल करणाऱ्या युझर्ससाठी दक्षता

1) यासाठी व्हाट्सअप ओपन करून सेटिंगमध्ये जावे लागेल.
2) अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करून प्रायव्हसी या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
3) खाली स्क्रोल करून ब्लॉक केलेला संपर्क निवडला पाहिजे.
4) वरच्या उजव्या कोपऱ्यात जाऊन ADD वर क्लिक करण्याची गरज आहे.
5) अनोळखी कॉलर निवडून ब्लॉक वर क्लिक केले पाहिजे.

स्क्रीन लॉक इनेबल करा

1) स्क्रीन लॉक इनेबल करण्यासाठी व्हाट्सअप उघडून सेटिंग्जवर जावे लागेल.
2) यानंतर अकाउंट ऑप्शनवर क्लिक करून प्रायव्हसी मोडवर जावे लागेल.
3) खाली स्क्रोल करा आणि स्क्रीन लॉक टॅप करावे लागेल.
4) अनलॉक करण्यासाठी येथे आवश्यक फेस आयडी/टच आयडी टॉगल ऑन करणे गरजेचे आहे. 5. स्क्रीन लॉक होण्यापूर्वी व्हाट्सअप बंद केल्यानंतर किती वेळ गेला पाहिजे हे तुम्ही निवडण्याचा पर्यायही आहे.

फॅक्टर ऑथेंटिकेशन (2-FA ) इनेबल करा

1) ते इनेबल करण्यासाठी व्हाट्सअप सुरू करून सेटिंग्जवर जावे लागेल.
2) अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर, टू-स्टेप व्हेरिफिकेशन वर टॅप करण्याची आवश्यकता आहे.
3) टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल लारावे लागेल.
4) येथे 6 अंकी पिन नंबर फील करून नेक्स्ट असे टॅप करावे लागेल.
5) तुमचा ईमेल आयडी प्रविष्ट केला पाहिजे.
6) त्यानंतर तुम्हाला कोडसह ईमेल मिळणार आहे. व्हाट्सअपमध्ये कोड टाकावा लागेल आणि NEXT वर क्लिक करण्याची गरज आहे.