Wheat Farming | कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी विकसित केली गव्हाची नवीन जात; मिळेल 80 ते 100 क्विंटल पर्यंत उत्पादन

Wheat Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Wheat Farming | महाराष्ट्रातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. बहुतांश लोक हे शेती करतात. सध्या खरीप हंगामातील भात आणि सोयाबीन ही पिके काढणीच्या मार्गावर आलेली आहेत. खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर लगेच रबी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. या हंगामात खास करून गव्हाची लागवड (Wheat Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजारात देखील गव्हाला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो.

मागील वर्षी महाराष्ट्रात पाऊस खूप कमी पडला, तरी देखील गव्हाची (Wheat Farming) मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली होती. परंतु यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत चांगलाच पाऊस पडलेला आहे. त्यामुळे यावर्षी गव्हाची लागवड करण्याचे क्षेत्र देखील महाराष्ट्रात वाढू शकते असे म्हटले जाते. गव्हाची लागवड अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. तरीदेखील नैसर्गिक आपत्ती, वादळवारा यासारख्या गोष्टींमुळे पिकांना नुकसान होते. तर कधी कधी बाजारात देखील चांगला भावना मिळाल्याने शेतकऱ्याचे परिणामी आर्थिक नुकसान होते.

रबी हंगाम सुरू झाला की, हवामानात सातत्याने बदल होत असतात. कधी तापमान वाढत वाढते, तर कधी अचानक परतीचा पाऊस येतो. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाचे उत्पादन घेण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या बाजारात गव्हाच्या नवनवीन जाती विकसित झालेल्या आहेत. अशातच देशातील कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची एक नवीन जात विकसित केलेली आहे. या जातीचे नाव एचडी 3385 असे आहे. आता ही जात नक्की काय आहे? त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

एचडी 3385 जातीची वैशिष्ट्य | Wheat Farming

भारतीय कृषी संशोधन संस्थेने या एचडी 3385 गव्हाची जात विकसित केलेली आहे. कर्नाल या संस्थेने ही जात विकसित केलेली आहे. गव्हाची ही जात प्रामुख्याने उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व मैदानी क्षेत्रासाठी आहे. या जातीची वेळेवर पेरणी केली जाऊ शकते. तसेच वेळेवर काढणे देखील होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचे चांगले उत्पादन मिळते. याची खास वैशिष्ट्य म्हणजे ही जात तांबेरा या रोगास प्रतिकारक असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच पिवळा तपकिरी आणि काळा या तिन्ही प्रकारचा तांबेरा रोगास ही जात प्रतिकारक आहे. या जातीची लागवड केल्यास तुम्हाला साधारणपणे 60 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते

गव्हाच्या या जातीची लागवड करण्यासाठी वातावरण अनुकूल लागते. ही जात 38 सेंटीमीटर पर्यंत वाढते. तसेच हेक्टरी तुम्हाला 73 ते 74 क्विंटल पर्यंत उत्पादन घेता येते. या जातीची कमाल उत्पादन क्षमता ही 80 ते 100 क्विंटल एवढी आहे. तुम्हाला जर योग्य नियोजन आणि हवामानाची साथ मिळाली, तर तुम्ही 100 क्विंटल पर्यंत देखील याचे उत्पादन घेऊ शकता. या जातीची ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी केली जाते.