2024 वर्षात महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे आता हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांना देखील सुरुवात होईल. जानेवारी महिन्यातील मकर संक्रांत संपली की मार्चमध्ये महाशिवरात्री (Mahashivratri) येईल. महाशिवरात्री म्हणजेच शिवशंकर यांचा दिवस. यादिवशी शिवभक्त देवांचे देव महादेव यांची आराधना करतात. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी हीच महाशिवरात्री कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी आली आहे, जाणून घेऊयात.

महाशिवरात्री कधी आहे?

येत्या 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आली आहे. यादिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत महादेवाची आराधना करण्याची परंपरा आहे. तर दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार पाहिला गेलो होतो, महाशिवरात्रीचा उत्सव माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केला जाईल. तसेच, उत्तर भारतीय दिनदर्शिकेनुसार, महाशिवरात्री फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री म्हणून साजरी करण्यात येईल.

महाशिवरात्रि शुभमुहूर्त

हिंदू धर्मानुसार, 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. यादिवशी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी महाशिवरात्री सुरू होईल. तर, दुसऱ्या दिवशी 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. या काळात तुम्ही महादेवाची मनोभावे पूजा केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत.

पूजेचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार पाहायला गेलो तर, 9 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिट ते 12 वाजून 56 मिनिटांपर्यंतच पूजेचा शुभ मुहूर्त असेल. तसे पाहता महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही आपण करू शकतो.

महाशिवरात्री साजरी करण्याचे कारण?

दोन कारणांसाठी महाशिवरात्री सण सर्वात खास ठरतो. असे म्हणतात की, यादिवशी महादेवाने संन्यास सोडून गृहस्थ जीवनात प्रवेश केला होता. तसेच, यादिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा शुभविवाह झाला होता. इतकेच नव्हे तर असेही म्हणतात की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर पहिल्यांदा प्रकट झाले होते. अशा अनेक कारणांसाठी महाशिवरात्री सण महत्त्वाचा ठरतो.