हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुस्लिम बांधवांसाठी रमजान हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. रमजानच्या संपुर्ण महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव उपवास धरतात. या पवित्र महिन्याला दयेचा महिना देखील म्हणले जाते. आजवर शतकानुशतके रमदान महिन्यात उपवास धरण्याची परंपरा चालत आली आहे. परंतु यावर्षी रमजान कधी पासून सुरू होईल, हे तुम्हाला माहीत आहे? नसेल तर जाणून घ्या.
रमजान कधीपासून सुरू होणार?
2024 वर्षात रमजान 10 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. तसेच तो 9 एप्रिल रोजी संपेल. त्यानुसार 11 मार्च रोजी पाहिला रोजा करण्यात येईल. मुख्य म्हणजे, इस्लाममध्ये 5 स्तंभ आहेत. कलमा, नमाज, जकात, रोजा आणि हज. रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना असतो. ज्याची सुरूवात चंद्राच्या दर्शनावर अवलंबून राहते. असे म्हणतात की, रमजान महिन्यातच पवित्र कुराण ग्रंथाची सुरुवातीची वचनं लिहिली गेली आहेत. त्यामुळे रमजानमध्ये कुराण वाचण्यावर जास्त भर दिला जातो.
रमजान काळात काय केले जाते?
रमजान काळात रोजाला सूर्योदयापूर्वी सकाळच्या जेवणाने सुरूवात केली जाते. ज्याला सेहरी देखील म्हणतात. सेहरी करून उपवास पकडला जातो. पुढे सूर्यास्तानंतर हा उपवाससोडण्यात येतो. ज्याला इफ्तार असे म्हणतात्त. खास म्हणजे, रमजान महिना शांततेचा, दयेचा, चांगुलपणाचा मानला जातो. या काळात मुस्लीम बांधव गरजूंना जेवू घालणे, मदत करणे, दान करणे, अशा गोष्टींवर जास्त भर देतात.